Rahul Gandhi Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही, राहुल गांधी आक्रमक

Rahul Gandhi On CJP Protest: राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत संसदेत चर्चा होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

Priya More
  • सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा विरोधकांकडून निषेध

  • विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला

  • जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत चर्चा नाही

  • राजीनामा नाही तोपर्यंत लोकसभा-राज्यसभेत चर्चा होऊन देणार नाही

दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विद्यार्थी आणि विरोधी पक्षाने नीट पेपर फुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या घटनेचे पडसाद संसदेत देखील उमटत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावरून विरोधक आक्रमक झाले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करण्यात येत आहे. अशामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला थेट इशारा दिला. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत चर्चा होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जंतरमंतरवर झालेल्या लाठीचार्जबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. तसेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. त्याशिवाय संसदेत आणि बाहेरही कोणतीही चर्चा होणार नाही, अशा स्पष्ट शब्दात विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून संसेदेबाहेर आंदोलन करण्यात आले. राजीनामा दिल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि नीट पेपर फुटी प्रकरणावर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधाक गोंधळ घालतात आणि दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब होते.

आजही कामकाज सुरू होताच सरकारने नीट पेपरफुटीवर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. पण विरोधकांनी आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यानंतर चर्चा करू असे सांगितले. त्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला आणि कामकाज २७ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचे कामकाज देखील सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला ठरला, पण एकाच अटीवर भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी, पाहा वेळापत्रक

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीच्या २ मागण्या सरकारकडून मान्य

BREAKING: पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब

Dry Day : शनिवारी महाराष्ट्रात ड्राय डे! 'या' कारणामुळे दारूची सर्व दुकाने आणि बार राहणार बंद

केसांना टोमॅटोचा रस लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT