Pappu Yadav Saam Tv
देश विदेश

Bihar Politics: बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही, पप्पू यादव यांचं वक्तव्य

Rahul Gandhi News: बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही, असं बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले पप्पू यादव म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीए विरुद्धच्या महाआघाडीच्या पराभवासाठी पप्पू यादव यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) नेते तेजस्वी यादव यांना जबाबदार धरले आहे. तेजस्वी यांचे नाव न घेता पप्पू यादव म्हणाले की, बिहारच्या युवराजांना अहंकार नसता तर महाआघाडीला 25 जागा मिळाल्या असत्या. अहंकारामुळे बिहार दयनीय झाला. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असाल तर मन मोठे असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी माजी तेजस्वी यादव यांना दिला.

बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले पप्पू यादव यांनी शनिवारी पत्रकारशांची बोलताना सांगितले की, एका व्यक्तीमुळे महाआघाडीने अररिया, सुपौल, मधेपुरा, दरभंगा, मधुबनी या सर्व जागा गमावल्या. सीतामढी आणि शिवहर लोकसभा गमावण्यात अर्थ नव्हता. सिवानमध्येही असेच झाले.

बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही

ते म्हणाले, बेगुसरायमध्ये काँग्रेस नेता कन्हैया कुमारला उमेदवारी दिली असती तर परिस्थिती वेगळी असती. बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही.

पप्पू यादव म्हणाले की, जर पवन सिंह काराकाटमध्ये नसते तर राजपूत एकत्र आले नसते आणि कुशवाहाची मते वळवली नसती. कुशवाह यांच्या मतांमुळेच महाआघाडीने आसपासच्या जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी पप्पू यादव यांनी आपला जनाधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. त्यांना पूर्णियातून काँग्रेसचे तिकीट मिळेल, असे वाटत होते. मात्र ही जागा आरजेडीने आपल्या खात्यात घेतली.

यानंतर नाराज पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पूर्णियातून विजयी झाले. त्यांनी पूर्णियामध्ये जेडीयूचे संतोष कुशवाह यांचा पराभव केला. येथून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या बीमा भारती तिसऱ्या स्थानावर होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT