Modi 3.0 Government: राज्यातील ‘या’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी? शिंदे गटाला किती मंत्रिपदं? रामदास आठवलेंचं काय होणार?
गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी
नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
यावेळी मोदींसोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही काही मंत्रीपदं येणार आहेत. यात शिंदे गट आघाडीवर आहे.
भाजपकडून हे मंत्री घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
नितीन गडकरी
पीयूष गोयल
उदयनराजे भोसले
हेमंत सावरा
रक्षा खडसे
शिवसेना (शिंदे गट)
प्रतापराव जाधव
श्रीकांत शिंदे
धैर्यशील माने
राष्ट्रवादी (अजित पवार गट)
प्रफुल्ल पटेल
शिंदे गटाला दोन मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे. यातलं एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद असेल. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्रआदित्य ठाकरेंना मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरेंवर जी टीका झाली, तीच टीका आपल्यावरही होऊ शकते याची भीती असल्यानं एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळणार का?
दरम्यान, रामदास आठवले यांच्या पक्षाने महायुतीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकही सीट न घेता आठवले यांनी देशभर भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जातंय. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आठवलेंना कॅबिनेटपदी बढती देण्याबाबतचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. चार महिन्यावर विधानसभा निवडणुका असल्यानं आठवलेंना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
एनडीएत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे जास्त जागा असल्यानं या दोन पक्षांना सर्वाधिक मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.. मोदींच्या तिस-या टर्मच्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा मागच्या दोन मंत्रिमंडळापेक्षा वेगळा असेल हे निश्चित.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.