Raghav Chadha addresses media in Delhi, announcing exit from AAP along with six Rajya Sabha MPs ahead of BJP entry. saam tv
देश विदेश

देशाच्या राजकारणात उलथापालथ! विरोधकांचे ७ खासदार सत्तेत जाणार, यादी आली समोर; तिघांचा भाजपात आजच प्रवेश

Raghav Chadha Quits AAP: देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ! आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांच्यासह ७ राज्यसभा खासदार भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा

Omkar Sonawane

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा हे पक्षातून बाहेर पडले आहे. दिल्लीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, ते पक्षाच्या दोन तृतीयांश खासदारासंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे देखील होते.

राघव चड्ढा म्हणाले, आम्ही राज्यसभेतील 'आप'चे दोन तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानातील तरतुदीचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे ते म्हणाले, ज्या आपला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची 15 वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपली तत्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नव्हे तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते की मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे आज मी जाहीर करतो की मी 'आप' पासून वेगळे होत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ होत आहे.

राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून 'आप'ने हटवले

'आप'ने राघव चड्ढा यांना 2 एप्रिल रोजी पक्षाच्या राज्यसभा खासदारांच्या उपनेतेपदावरून हटवले. या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र सादर करण्यात आले. ज्यामध्ये म्हटले की त्यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्याचा वेळ देऊ नये. 'आप'ने फागवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. राघव चड्ढा हे 2022 पासून पंजाबमधून 'आप'चे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपेल.

कोणते खासदार भाजपमध्ये जाणार? यादी आली सामोर

राघव चड्ढा म्हणाले, राज्यसभेत आपचे 10 खासदार आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजेच सात आमच्यासोबत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे;

राघव चड्ढा

संदीप पाठक

राजेंद्र गुप्ता

विक्रम साहनी

स्वाती मालीवाल

हरभजन सिंग

अशोक मित्तल

राघव चड्ढा म्हणाले, अजुनही बरेच जण येणार आहे. भाजपमध्ये सामील होण्याची प्रक्रिया आज संध्याकाळी होईल. भारताच्या संविधानात अशी तरतूद आहे की, जर दोन तृतीयांश जास्त खासदारांना दुसऱ्या पक्षात सामील व्हायचे असेल तर ते तसे करू शकतात. हा अधिकार आम्हाला भारताच्या संविधानानेच दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की, मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे आज मी जाहीर करतो की मी आप पासून दूर जात आहे आणि जनतेच्या अधिक जवळ येत आहे. राघव चड्ढा म्हणाले, राजकारणात येण्यापूर्वी मी एक व्यावसायिक चार्टड अकाऊंट CA होतो. या मंचावर माझ्यासोबत विविध क्षेत्रातील लोक होते. काही शास्त्रज्ञ, काही शिक्षणतज्ञ. आज आप सोडणाऱ्यांमध्ये एका जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूचा पद्मश्री विजेत्याचा आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्व व्यक्तीनी भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याचा दृढ निश्चयाने एकजूट होऊन आपले सर्वस्व त्याग करून या पक्षाची स्थापना केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे-पवारांचा पक्ष फोडला, तोच वॉशिंग मशिनचा खेळ पंजाबमध्ये; मुख्यमंत्री मान भाजपवर संतापले

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT