केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Raghav Chadha And 3 MPs Resigned From AAP: केजरीवालांच्या आम आदमी पक्षात मोठी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. राघव चड्ढांसह तीन खासदारांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Raghav Chadha and three AAP MPs resign amid reports of a possible switch to BJP.
Raghav Chadha and three AAP MPs resign amid reports of a possible switch to BJP.saam tv
Published On

राज्यसभा खासदार राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी आज आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना राघव चड्ढा म्हणाले, आम्ही राज्यसभेतील 'आप'चे दोन-तृतीयांश सदस्य भारताच्या संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चड्ढा हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. तसेच त्यांना राज्यसभेत बोलू न देण्याचे पत्र देखील आम आदमी पक्षाने केली होती. तसेच अरविंद केजरीवाल यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राघव चड्ढा यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी आज या सर्व चर्चेला विराम देत भाजपमध्ये जाण्याची अधिकृत घोषणा केली.

Raghav Chadha and three AAP MPs resign amid reports of a possible switch to BJP.
Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

राघव चड्ढा यांनी सांगितले की, 'आप'चे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त राज्यसभा खासदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी आधीच स्वाक्षरी केली आहे. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी आणि अशोक मित्तल यांच्यासह अनेक नेते राघव चड्ढा यांच्यासोबत सामील होत आहेत. राज्यसभेत 'आप'चे १० खासदार आहेत, त्यापैकी सात पंजाबचे आणि तीन दिल्लीचे आहेत. राघव चड्ढा, संदीप सिंग आणि अशोक मित्तल हे भारतीय जनता पक्षात औपचारिकपणे सामील होण्यासाठी लवकरच भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com