Supreme Court : पाकिटबंद खाद्यपदार्थाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, पाकिटावर येणार वेगवेगळे वॉर्निंग लेबल

Supreme Court Food Label Order : पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये जास्त साखर, मीठ किंवा फॅट असल्यास आता समोरच्या बाजूला लाल रंगाचे स्वतंत्र वॉर्निंग लेबल लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Supreme Court judgment
Supreme Court saam tv
Published On: 

Supreme Court order on packaged food warning labels in India : पाकिटबंद खाण्याचे पदार्थ घेताना ग्राहकांना आत काय आहे ते लगेच कळावे, यासाठी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. ज्या पदार्थांमध्ये फॅट, साखर किंवा मीठ प्रमाणापेक्षा जास्त असेल, त्यांच्या पाकिटाच्या समोर लाल रंगाच्या सहा कोनी चिन्हांमध्ये वेगवेगळी वॉर्निंग लिहिणे बंधनकारक करण्याचे आदेश कोर्टाने केंद्र सरकार आणि अन्न सुरक्षा विभागाला (FSSAI) दिले आहेत. त्यामुळे वस्तू घेतानाच ती आरोग्यासाठी कितपत योग्य किंवा धोकादायक आहे, हे ग्राहकांना सहज समजेल.

न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने कोर्टाने केंद्र सरकार आणि अन्न सुरक्षा विभागाला (FSSAI)योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एफएसएसएआयला (FSSAI) नवीन नियमांचा मसुदा तयार करण्याच्या अहवाल देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी १० आठवड्यांनंतर पुन्हा निश्चित करण्यात आली आहे.

३ वेगवेगळे वॉर्निंग लेबल

पाकिटावर ३ वेगवेगळे वॉर्निंगचे लेबल लावणे गरजेचे राहील. प्रत्येक चेतावणीचे चिन्ह लाल रंगाच्या षटकोन आकारात असावे. त्यात जास्त फॅट, जास्त साखर किंवा जास्त मीठ अशी स्पष्ट माहिती आणि चित्र असायला हवे. म्हणजेच, एखाद्या पाकिटामध्ये फॅट, साखर आणि मीठ हे तिन्ही घटक ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असतील, तर त्यासाठी तीन वेगवेगळी चिन्हे लावावी लागतील. एकाच चिन्हावर सर्व माहिती देऊन चालणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

FSSAI ला कोर्टाचे निर्देश

पदार्थात एकूण साखर आणि फॅटचे प्रमाण किती असेल? तर तो धोकादायक मानायचं याची मर्यादा ठरवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला दिले आहेत. फक्त वरून टाकलेली साखर किंवा फॅट न पाहता, पदार्थात असलेली एकूण साखर आणि फॅट विचारात घ्यावी, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

ही मर्यादा ठरवताना शास्त्रोक्त माहिती आणि अभ्यासाचा आधार घ्यायला हवा. मर्यादा खूपच कमी ठेवली तर जवळपास प्रत्येक पाकिटावर धोक्याची खूण येईल आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतील. पण मर्यादा खूपच जास्त ठेवली, तर आरोग्याला अपायकारक असलेले अनेक पदार्थही या वॉर्निंगमधून सुटतील असेही कोर्टानं म्हटलं आहे.

Supreme Court judgment
Ladki Bahin Yojana : १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

पाकिटावरचे चिन्ह किती मोठे असेल?

सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, प्रत्येक लाल चिन्ह पाकिटाच्या समोरच्या मुख्य भागाच्या ४ ते ५ टक्के इतके मोठे असावे. त्यामुळे खरेदी करताना ते ग्राहकांच्या नजरेस सहज पडेल. तसेच, त्या चिन्हात लिहिलेला मजकूर साध्या उजेडातही सहज वाचता येईल इतका स्पष्ट आणि मोठा असावा. त्यासोबतच कोर्टाने २०२० च्या अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांची नीट अंमलबजावणी करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले आहेत.

Supreme Court judgment
New KYC Rules : मोठी बातमी! KYC चे नियम बदलले, SEBI चा मोठा निर्णय, आताच घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.