Ladki Bahin Yojana : १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

Namdeo Kumbhar

लाडकी बहीण योजनेचे १,५०० रुपये रखडले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ऑक्टोबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाही.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

नोव्हेंबर संपत आला, प्रतीक्षा कायम

नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाही ऑक्टोबरचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

लग्नसराईत महिलांना अपेक्षा

सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने या आर्थिक मदतीची महिलांना मोठी अपेक्षा होती. मात्र, हप्ता वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

थेट खात्यात जमा होतात १,५०० रुपये

लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा केली जाते.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

या आठवड्यात पैसे येणार का?

ऑक्टोबरचे पैसे रखडलेले असतानाच नोव्हेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी हप्ता जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Ladki Bahin Yojana October Installment date update | pinterest

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शक्यतेचा अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही अहवालांमध्ये २८ नोव्हेंबरनंतरचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

अद्याप अधिकृत तारीख नाही

पैसे कधी जमा होतील, याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

निधीच्या नियोजनाची चर्चा

राज्यातील काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या निधीचे नियोजन आणि समायोजन सुरू असल्याची चर्चा आहे.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

विलंब होण्यामागे हेच कारण?

निधीच्या नियोजनामुळेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest

पुढे काय होणार?

ऑक्टोबरचा हप्ता रखडल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. शासनाकडून हप्ता वितरणाबाबत नेमकी काय घोषणा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Ladki Bahin Yojana October Installment | pinterest
Avoid these 3 common smartphone charging mistakes during winter to protect your battery. | saam tv
Smartphone Tips : रात्री ब्लँकेटमध्ये फोन चार्जिंगला लावताय? ३ चुका बॅटरीचा खेळ संपवतील