Smartphone Tips : रात्री ब्लँकेटमध्ये फोन चार्जिंगला लावताय? ३ चुका बॅटरीचा खेळ संपवतील

Namdeo Kumbhar

थंडीत फोन चार्ज करताय? या ३ चुका टाळा

हिवाळ्यात स्मार्टफोन चार्ज करताना आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो.

Phone Charging Safety Tips | pinterest

तापमान हाच बॅटरीचा खरा शत्रू

स्मार्टफोनच्या बॅटरीला अतिथंडी आणि अतिउष्णता दोन्ही घातक ठरतात. चार्जिंगदरम्यान फोनचे तापमान संतुलित राहणे खूप गरजेचे असते.

Phone Charging Safety Tips | pinterest

चूक १ – थंड झालेल्या फोनला लगेच चार्जिंगला लावणे

बाहेरच्या थंड वातावरणातून आल्यावर फोन एकदम थंड असतो. अशा वेळी तो लगेच चार्जिंगला लावल्यास लिथियम-आयन बॅटरीमधील आयनचा प्रवाह व्यवस्थित होत नाही.

Phone Charging Safety Tips | pinterest

थंड फोनसाठी काय कराल?

फोन आधी खोलीच्या सामान्य तापमानावर येऊ द्या. तो थोडा सामान्य झाल्यावरच चार्जिंगला लावा; लवकर गरम करण्यासाठी कोणत्याही उष्ण वस्तूच्या संपर्कात आणू नका.

Phone Charging Safety Tips | pinterest

चूक २ – हीटर किंवा ब्लोअरजवळ फोन चार्ज करणे

थंडीपासून बचावासाठी आपण हीटर किंवा ब्लोअर वापरतो. पण फोन लवकर गरम व्हावा म्हणून किंवा त्याजवळ ठेवून चार्ज केल्यास बॅटरीला मोठा धोका पोहोचू शकतो.

Phone Charging Safety Tips | pinterest

अतिउष्णतेचा धोका

हीटर किंवा ब्लोअरच्या जवळ चार्जिंग केल्यास फोन खूप जास्त तापतो. त्यामुळे बॅटरी खराब होण्याबरोबरच ती फुटण्याचा धोकाही संभवतो.

Phone Charging Safety Tips | pinterest

चूक ३ – ब्लँकेट, उशी किंवा गादीखाली फोन ठेवणे

थंडीत अंथरुणावर बसून फोन वापरताना अनेक जण चार्जिंग सुरू असतानाच फोन ब्लँकेट किंवा उशीखाली ठेवतात. ही सवय बॅटरी आणि सुरक्षेसाठी धोकादायक आहे.

Phone Charging Safety Tips | pinterest

उष्णता कोंडल्यास काय होते?

चार्जिंगदरम्यान फोन आणि चार्जरमधून उष्णता बाहेर पडते. ब्लँकेट किंवा उशीखाली फोन ठेवल्यास ही उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि फोन ओव्हरहीट होतो.

Phone Charging Safety Tips | pinterest

सुरक्षित चार्जिंगसाठी योग्य जागा कोणती?

फोन नेहमी सपाट आणि कठीण पृष्ठभागावर ठेवून चार्ज करा. आजूबाजूला हवा खेळती राहील अशी जागा निवडा.

Phone Charging Safety Tips | pinterest

चार्जिंग सुरू असताना हे टाळा

चार्जिंग सुरू असताना हेवी गेम्स किंवा जड ॲप्स चालवणे टाळा. योग्य सवयी पाळल्यास हिवाळ्यातही फोनची बॅटरी दीर्घकाळ चांगली टिकते.

Phone Charging Safety Tips | pinterest
How to Store Lemons, | साम टीव्ही
Kitchen Hacks : फ्रीजमध्ये लिंबू खराब होतात? ६ महिने फ्रेश ठेवण्याचा जुगाड