Baby Care : लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Side effects of baby kajal : पारंपरिक पद्धतीनुसार नवजात बाळाला काजळ लावणं शुभ मानलं जात असलं, तरी वैद्यकीयदृष्ट्या लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ अयोग्यासाठी हानिकारक आहे. कसे ते जाणून घ्या.
The Hidden Dangers of Traditional Kajal for Babies
The Hidden Dangers of Traditional Kajal for Babiessaam tv
Published On: 

लहान बाळांच्या डोळ्यांत काजळ लावण्याची प्रथा अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे सुरू आहे. बाळाचे डोळे सुंदर दिसावेत, डोळ्यांचा आकार मोठा व्हावा किंवा त्यांची दृष्टी चांगली राहावी, या समजुतीतून अनेक पालक बाळाच्या डोळ्यांत काजळ लावतात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ लावणे सुरक्षित नाही. उलट, या सवयीमुळे बाळाच्या नाजूक डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते.

बाजारात मिळणाऱ्या काही काजळांमध्ये शिसे सारखे हानिकारक घटक आढळू शकतात. शिसे शरीरात गेल्यास लहान मुलांच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकारक यंत्रणा आणि शरीरातील अवयव विकसित होत असल्याने अशा पदार्थांपासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

The Hidden Dangers of Traditional Kajal for Babies
Health Tips : रोज सकाळी भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' ७ बदल; हृदयापासून ते झोपेपर्यंत मिळतात अनेक फायदे

डोळ्यांना होऊ शकते जळजळ आणि संसर्ग

बाळांचे डोळे अत्यंत संवेदनशील असतात. काजळातील बारीक कण डोळ्यांत गेल्यास डोळे लाल होणे, खाज येणे, जळजळ होणे आणि ॲलर्जी होण्याचा धोका असतो. तसेच अस्वच्छ हातांनी किंवा एकाच काजळाचा वारंवार वापर केल्याने डोळ्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. काही वेळा काजळाचे कण अश्रू वाहून नेणाऱ्या नलिकेत अडथळा निर्माण करू शकतात.

काजळ लावल्याने डोळ्यांचा आकार वाढतो का?

बाळांच्या डोळ्यांत काजळ लावल्याने डोळ्यांचा आकार मोठा होतो किंवा दृष्टी अधिक तीक्ष्ण होते, हा केवळ गैरसमज आहे. काजळाचा डोळ्यांची दृष्टी सुधारण्याशी कोणताही सिद्ध संबंध नाही. त्यामुळे डोळ्यांच्या आत, पापण्यांच्या कडेवर किंवा डोळ्यांच्या आसपास काजळ लावणे टाळावे.

The Hidden Dangers of Traditional Kajal for Babies
Health Tips : जेवताना पाणी पिता? मग ही चूक करताय की योग्य सवय लावताय? जाणून घ्या सत्य

परंपरा पाळायची असल्यास काय काळजी घ्यावी?

काही कुटुंबांमध्ये काजळ लावणे ही धार्मिक किंवा पारंपरिक प्रथा असते. अशा वेळी डोळ्यांपासून दूर कपाळावर किंवा पायाच्या तळव्यावर छोटी टिकली लावण्याचा पर्याय निवडता येतो. मात्र, त्यामुळेही त्वचेवर जळजळ किंवा ॲलर्जी होत नाही ना, याची काळजी घ्यावी. घरगुती पद्धतीने तयार केलेले काजळदेखील पूर्णपणे सुरक्षित असेल याची खात्री नसते.

बाळांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

  • बाळांचे डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी आणि मऊ, स्वच्छ कापड वापरावे.

  • डोळे पुसण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवावेत.

  • बाळाच्या डोळ्यांत सतत पाणी येणे, लालसरपणा, सूज किंवा पिवळसर चिकट स्त्राव दिसल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी बालरोगतज्ज्ञ किंवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.