Prajwal Revanna Saam Digital
देश विदेश

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना लवकरच भारतामध्ये येणार, जर्मनीवरून बंगळुरूला येण्यासाठी फ्लाइट तिकीट बुक

Karnataka Sex Scandal Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहतील. ३० मे रोजी प्रज्वल रेवन्ना हे भारतामध्ये परत येणार आहेत.

Priya More

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात (Karnataka Sex Scandal Case) मोठी अपडेट समोर आली आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) भारतामध्ये परत येत आहे. ३० मे म्हणजे उद्या ते भारतामध्ये येणार आहे. त्यांनी जर्मनीतील म्यूनिख ते बंगळुरू असे फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत. विशेष तपास पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील.

अशी देखील माहिती समोर येत आहे की, प्रज्वल रेवन्ना बंगळुरूला पोहचताच त्यांना अटक केली जाईल. त्यासाठी एसआयटी टीम कॅम्पेगौड एअरपोर्टवर सतत लक्ष ठेवून आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकात अनेक सेक्स टेप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या महिलांचा लैंगिक छळ करणारी व्यक्ती प्रज्वल रेवन्ना असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशामध्ये पळून गेले.

हसन लोकसभा मतदारसंघातून एनडीए पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढवणारे खासदार प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरण समोर आल्यानंतर परदेशात पळून गेले होते. कर्नाटक राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आक्षेपार्ह व्हिडीओंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओंमध्ये प्रज्वल रेवन्ना अनेक महिलांचे लैंगिक छळ करताना दिसत आहेत. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

नुकताच एचडी देवेगौडा यांनी आपल्या नातवाला भारतामध्ये परत येण्याचा सल्ला दिला. जर त्याने असे केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. यानंतर प्रज्वल रेवन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये त्यांनी ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना यांनी यापूर्वी दोन वेळा जर्मनीवरून फ्लाइटची तिकिटे रद्द केली आहेत. दरम्यान, एसआयटीने मंगळवारी प्रज्वल रेवन्ना यांच्या हसन जिल्हा मुख्यालयातील निवासस्थानाची झडती घेतली. एसआयटीकडून रात्रभर रेवन्ना यांच्या निवासस्थानाची झडती सुरू होती. याठिकाणावरून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT