Loksabha Election 2024: 45 प्लसचा नारा ठरणार का खरा, मुस्लीम-मराठ्यांचा महायुतीला धसका?

Ajit Pawar On Maharashtra Loksabha Election Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये मुस्लीम- मराठ्यांचा महायुतीच्या नेत्यांनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे.
Loksabha Election 2024: 45 प्लसचा नारा ठरणार का खरा, मुस्लीम-मराठ्यांचा महायुतीला धसका?
Ajit Pawar On Maharashtra Loksabha Election ResultSaam TV

विनोद पाटील, साम टीव्ही

देशात सर्वाधिक उत्सुकता लागलीय ती महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालांची (Loksabha Election 2024). कारण बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भल्याभल्यांना आकलन करणं कठीण जातंय. आता तर 45 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनीही धसका घेतलाय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Deputy CM Ajit Pawar) या निकालांबाबत ब्रह्मदेवालाही काही सांगता येणार नाही असं जाहीर विधान केलंय. नेमक्या कोणत्या फॅक्टरमुळे निवडणूक चुरशीची झालीय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आपण पाहणार आहोत...

देशात एनडीएनं 400 पारचा नारा दिलाय. तर राज्यात महायुतीनं 45+ चा नारा दिलाय. मात्र राज्यात पाच टप्प्यात झालेल्या मतदानानंतर महायुतीच्या नेत्यांचा विश्वास कमी व्हायला लागलाय की काय असं चित्र निर्माण झालंय. आणि दुसरं तिसरं कुमी नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच याबाबत शंका व्यक्त केलीय. राज्यात मतदानादरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे निकालाचा चांगचाल धसका अजित पवारांनी घेतलाय. ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही राज्यात काय होईल, अशा शब्दात अजित पवारांनी निकालाच्या अंदाजाबाबत जाहीर विधान केलंय. त्यामुळेच मविआलाही स्फूर्ती आलीय.

Loksabha Election 2024: 45 प्लसचा नारा ठरणार का खरा, मुस्लीम-मराठ्यांचा महायुतीला धसका?
Loksabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

मराठवाड्यातल्या बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमधल्या प्रचाराला मराठा आणि मराठेतर रंग देण्यात आला. त्यावरही अजितदादांनी सडकून टीका केली. जग कुठं चाललंय आणि आपण जातीपातीत अडकल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण पाहायला मिळालं, असे वक्तव्य त्यांनी केले.

Loksabha Election 2024: 45 प्लसचा नारा ठरणार का खरा, मुस्लीम-मराठ्यांचा महायुतीला धसका?
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

मराठा आरक्षणाच्या मुद्याचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीवर पाहायला मिळाला आणि यामुळे जर जातीय ध्रुवीकरण झालं तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो हीच अजित पवारांना भीती असावी. मुस्लीमविरोधक प्रतिमा असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला यंदा मिळणारं मस्लिमांचं समर्थन महायुतीच्या नेत्यांनीही मान्य केलंय. त्यामुळे मुस्लीम आणि मराठा हे दोन फॅक्टर 45+ मधले सर्वात मोठे अडथळे ठरणार की नाही हे अजितदादा सांगतात त्यानुसार ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. ते थेट चार जूनलाच कळणार आहे.

Loksabha Election 2024: 45 प्लसचा नारा ठरणार का खरा, मुस्लीम-मराठ्यांचा महायुतीला धसका?
Loksabha Election: लोकसभा निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे; कोणाची भाकीतं ठरणार खरी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com