Loksabha Election: लोकसभा निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे; कोणाची भाकीतं ठरणार खरी?

Loksabha Election Result Prediction: लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तर्क-वितर्क काढले जात आहेत. राजकीय विश्लेषकही या आकडेवारी दावे-प्रतिदावे करतायत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिलीय.
Loksabha Election: लोकसभा निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे; कोणाची भाकीतं ठरणार खरी?
Loksabha Election Result PredictionSaam Tv
Published On

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

मुंबई: लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे,सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आकडेवारीचे दावे करतायत. दरम्यान, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादवांच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिलीये. या दोघांनीही भाजपच्या जागांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले असले तरी भाजपा मित्रपक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा दावाही योगेंद्र यादव करतायत.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आकडेवारीचे दावे-प्रतिदावे करतायत.दरम्यान, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिलीये. दोघांनीही भाजपच्या जागांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवलेत. मात्र भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा सूर दोघांनी केलेल्या भाकितातून उमटतोय.

योगेंद्र यादवांनी अंतिम आकलन अशा आशयाचा लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाकीत करणारा व्हिडिओ केला होता. प्रशांत किशोरांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला होता. त्यावरुन दोन्ही राजकीय रणनितीकारांनी काय दावे-प्रतिदावे केलेत पाहूया

भाजपला स्वबळावर 370 जागा जिंकणे अशक्य, भाजप 240 ते 260 जागा जिंकेल, एनडीएचे मित्रपक्ष 35 ते 45 जागा जिंकतील, काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकेल, आणि त्याच्या इंडिया ब्लॉक सदस्यांना 120 ते 135 जागा मिळतील, इंडिया आघाडीला 205 ते 235 जागा मिळतील, केरळपासून ओडिशापर्यंत मतं आणि जागा या दोन्हीमध्ये भाजपला फायदा होईल. तर किशोर यांनी स्क्रिनशॉट शेअर करत म्हटलंय...देशातील निवडणुकांचा आणि सामाजिक-राजकीय विषयांची उत्तम समज असणाऱ्यांमध्ये योगेंद्र यादव यांचा चेहरा विश्वासार्ह मानला जातो. त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्वतःचे अंतिम आकलन मांडलंय,यादवांच्या म्हणण्यानुसार

भाजप स्वबळावर 240-260 आणि एनडीएच्या मिळून 275 – 305 जागांवर पोहोचू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. विद्यमान लोकसभेत एनडीएच्या 323 जागा आहेत. (यात शिवसेनेच्या 18 जागा आहेत, मात्र ते आता एनडीएचा भाग नाहीत.) आता तुम्ही स्वतःच विचार करा की कशापद्धतीने सरकार स्थापन होणार आहे. बाकी 4 जूनला सर्व स्पष्ट होईलच.”

देशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत..भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येतायत.त्यात राजकीय रणनितीकारांनी केलेल्या भाकितांमध्ये कितपत तथ्य आहे यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल.

Loksabha Election: लोकसभा निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे; कोणाची भाकीतं ठरणार खरी?
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद; कोणत्या राज्यात किती झालं मतदान? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com