Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद; कोणत्या राज्यात किती झालं मतदान? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 Update : आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6 राज्यातील ५८ मतदारसंघांमध्ये 59.16 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक विक्रमी 78.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital

देशातील लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ६ राज्यांमधील ५८ मतदारसंघात आज मतदान झालं. अनेक उमेदवारांच भवितव्य मतदान पेटीत बंद झालं असून ४ जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशात 59.16 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक विक्रमी 78.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 52.28 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी 6 नंतरही मतदान सुरू होतं त्यामुळे मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यात किती झालं मतदान?

बिहार - 53.60%

हरियाणा - 58.44%

जम्मू आणि काश्मीर - 52.28%

झारखंड - 62.87%

नवी दिल्ली - 54.80%

ओडिसा - 60.07%

उत्तर प्रदेश- 54.03%

पश्चिम बंगाल - 78.19%

या लोकसभा निवडणुकीत देशाची राजधानी दिल्लीचे राजकीय चित्र बदललं आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने आता २०२४ च्या निवडणुकीत त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी करून भाजपला आव्हान दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची जुळवाजुळव यशस्वी ठरली, तर देशाच्या राजकारणावर त्याचा खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर अवघ्या आठ महिन्यांनी दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आप आणि काँग्रेसमधील मैत्री यशस्वी झाली तर विधानसभा निवडणुकीतील दिल्लीचं चित्र काहीसं वेगळं असणार आहे.

Lok Sabha Election 2024
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी भरसभेत दिली महिला आणि युवकांना 'गॅरंटी'; बेरोजगारीवरून भाजपवर हल्लाबोल

निवडणूक आयोगाने आज पहिल्या चार टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ११,००,५२,१०३ म्हणजेच ६६.१४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसऱ्या टप्प्यात १०,५८,३०,५७२ मतदारांनी मतदान केलं. या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदारांची नोंद झाली. तिसऱ्या टप्प्यात ११,३२,३४,६७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चौथ्या टप्प्यात १२,२६,६९,३१९ मतदारांनी तर पाचव्या टप्प्यात ५,७१,०६,१८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या टप्प्यात ६२.२० टक्के नागरिकांनी नोंद झाली.

Lok Sabha Election 2024
Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com