Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; नेमकं कारण काय?

Madha Loksabha Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: माढा लोकसभा मतदार संघातही धैर्यशिल मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल ११ बुलेटची पैज लागली होती. मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकाने माघार घेतली आहे.
Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; कारण काय?
Madha Loksabha Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: Saamtv

भारत नागणे, प्रतिनिधी|ता. २५ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालाबाबत अनेक अंदाज वर्तवले जात असून आपलेच नेते विजयी होणार असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये अगदी लाखोंच्या पैजा लावल्या जात आहेत. माढा लोकसभा मतदार संघातही धैर्यशिल मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल ११ बुलेटची पैज लागली होती. मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकाने माघार घेतली आहे.

लोकसभेच्या रणधुमाळीत यंदा माढा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला होता.माढा लोकभा मतदार संघात यावेळी भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

अशातच माढा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत ११ बुलेट गाड्याची पैज जाहीर केली होती. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहांनी पाटील यांचे चॅलेज स्विकारात पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते.

Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; कारण काय?
Mumbra Accident Video: मुंब्रा बायपासवर भयंकर अपघात! ट्रकचा टायर फुटून टेम्पोला धडक, एकाचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

मात्र आता 11 बुलेट गाड्यांची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे. तर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत. कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे, तर पैजाचा विडा उचलणाऱ्या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; कारण काय?
Pune News: मित्रांसोबत पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ घडला; तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com