Loksabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

Know When and Where To Watch Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल तुम्ही कुठे आणि कसा पाहाल हे घ्या जाणून...
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Know Where To Watch Loksabha Election 2024 ResultSaam TV
Published On

देशामध्ये लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) ही सात टप्प्यामध्ये पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सातवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी येत्या १ जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये ५ टप्प्यांमध्ये तर देशामध्ये ७ टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागेल ते म्हणजे निवडणुकीच्या निकालावर. येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून यामध्ये नक्की कोणत्या पक्षाचा विजय होणार याचे चित्र स्पष्ट होईल. देशामध्ये नेमकं कोणाचे सरकार येणार हे जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सर्वच राजकीय नेते उत्सुक आहेत. अशामध्ये ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) कुठे आणि कसा पाहायला मिळणार हे आज आपण जाणून घेणार आहोत....

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Loksabha Election: सरकार येताच एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात टाकणार ८५०० रुपये: राहुल गांधींची घोषणा

कोणत्या टप्प्यात किती मतदारसंघासाठी मतदान -

देशामध्ये एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघ आहेत. येत्या १ जूनला सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून यामध्ये बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगड याठिकाणच्या एकूण ५७ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याआधी देशामध्ये १९ एप्रिल रोजी १०२ लोकसभा मतदारसंघ, २६ एप्रिल रोजी ८९ मतदारसंघ, ७ मे रोजी ९४ मतदारसंघ, १३ मे रोजी ९६ मतदारसंघ, २० मे रोजी ४९ मतदारसंघ आणि २५ मे रोजी ५७ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या सर्व मतदारसंघांमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता शेवटच्या टप्प्यासाठी कसा प्रतिसाद मिळतोय हे १ जून रोजी समजेल.

देशात ७ टप्प्यांसाठी कधी झालं मतदान -

  • पहिला टप्पा - १९ एप्रिल

  • दुसरा टप्पा - २६ एप्रिल

  • तिसरा टप्पा - ७ मे

  • चौथ्या टप्पा - १३ मे

  • पाचवा टप्पा - २० मे

  • सहावा टप्पा - २५ मे

  • सातवा टप्पा - १ जून

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहाल -

सर्व देशाचे लक्ष लागले आहे ते म्हणजे देशामध्ये पुन्हा कोणाचे सरकार येणार याकडे. यासाठी सर्वजण ४ जूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही साम टीव्हीच्या https://saamtv.esakal.com/ या न्यूज वेबसाईटला भेट देऊ शकता. सकाळी ८ वाजल्यापासून याठिकाणी तुम्हाला निकाल पाहायला मिळू शकतो. यासोबतच साम टीव्ही या न्यूज चॅनेलवर देखील तुम्हाला सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीचे सर्व काही अपडेट्स पाहायला मिळतील. साम टीव्हीची वेबसाईट आणि न्यूज चॅनेलवर तुम्हाला कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाची आघाडी-कोणाची पिछाडी, कोण जिंकले, त्या मतदारसंघातील सध्य परिस्थिती काय या सर्वाची माहिती लवकर मिळणार आहे. सामच्या न्यूज वेबसाईटवर तुम्हाला एका क्लिकवर सर्व काही अपडेट्स मिळून जातील.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Shirur Loksabha Election 2024: कोण होणार शिरूरचा खासदार?, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

युट्यूबवर कसे पाहाल निकालाचे लाईव्ह प्रेक्षपण -

महत्वाचे म्हणजे, जर तुम्हाला दिवसभर टीव्हीसमोर बसून सर्व काही अपडेट्स पाहणे शक्य नसेल तर. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये देखील निवडणुकीचा निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला युट्यूबवर सकाळी ८ वाजल्यापासून साम टीव्हीवर दाखवण्यात येणारे निकालाचे लाईव्ह प्रेक्षपण https://www.youtube.com/@SaamTV/streams या लिंकवर क्लिक केल्यावर पाहायला मिळेल.

आणखी कुठे पाहाता येईल निकाल -

यासोबतच तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईटवर देखील पाहायला मिळेल. यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट https://hindi.eci.gov.in/ यावर जावे लागेल. वेबसाईटच्या मुखपृष्ठावरच तुम्हाला निकालाचे सर्व काही अपडेट्स मिळून जातील. दुपारपर्यंत निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल. पण अंतिम निकाल येण्यासाठी उशिर होईल.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात किती टक्के मतदान झालं?, एका क्लिकवर वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com