Delhi Heat Wave: सूर्य आग ओकतोय! उन्हाचा तडाख्यामुळे मजुरांचे हाल; अनेक ठिकाणी उष्मघाताचे बळी, उपराज्यपालांचा मोठा निर्णय

Delhi Heat Wave Alert LG Vinai Saxena Orders: दिल्लीत उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपराज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीत उन्हाचा तडाखा
Delhi Heat WaveSaamTv

राजधानी दिल्लीत उष्णतेनं कहर केला आहे. अनेक भागातील कमाल तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचं दिसून आलं आहे. मुंगेशपूरमध्ये मंगळवारी पारा ४९.९ अंशांवर पोहोचला होता. या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यांनी दिल्लीतील मजूर आणि कामगारांसाठी दिवसातून तीन तासांच्या सुट्टीचे आदेश दिले आहेत. त्यांना दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पगारी रजा देण्यात येणार असल्याची माहिती लाईव्ह हिंदुस्थानच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या उपराज्यपालांनी कामगारांसाठी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पगारी सुट्टीचा आदेश दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी एवढ्या उष्णतेमध्ये (Delhi Heat Wave) 'समर हीट ॲक्शन प्लॅन'वर कोणतीही कारवाई केली नसल्याची टीका देखील त्यांनी केली. त्यांनी मुख्य सचिवांना तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेशा प्रमाणात पाणी आणि नारळपाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीच्या बसस्थानकांवर पाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजात (Heat Wave Alert), दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४३ टक्के होते. शहरातील अनेक भागात कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दिल्लीत उष्णतेची लाट कायम (Delhi Temprature) राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीत उन्हाचा तडाखा
Akola Heat Wave : अकोल्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; १ जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. वाढत्या तापमानामुळे सर्व वयोगटातील लोकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर उपराज्यपालांनी (Delhi News) मोठा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ३ या कालावधीत मजूरांना सुट्टी देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, तसेच बसस्थानकांवर पाण्याची सोय करण्यास देखील सांगितलं आहे.

दिल्लीत उन्हाचा तडाखा
Heat Wave Alert : उत्तर भारतात भयंकर उकाडा; राजस्थानमध्ये उष्माघाताने ८ लोकांचा मृत्यू, अनेक भागांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com