Karnataka Politics Saam Tv
देश विदेश

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Karnataka Politics: कर्नाटकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांना मोठा धक्का बसला. कॅबिनेट मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

Priya More
  • कर्नाटकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली

  • मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

  • बंगळुरू विकास खाते न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली

  • मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप

कर्नाटकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डी. के शिवकुमार यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करत मंत्रिपद सोडण्यामागचं कारण सांगितलं. बंगळुरू विकास खाते नाकारल्यामुळे ते नाराज होते. आवडतं खातं न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मंत्रिपद सोडले.

आपल्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर रामलिंगा रेड्डी पत्रकारांना म्हणाले की, बंगळुरू विकास खाते मला दिले जाईल असे त्यांनी दोनदा मला सांगितले होते. पण त्यांनी ते खाते मला दिले नाही. त्यामुळे मी नाराज झालो असे म्हणत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. तसंच, 'मी आमदार म्हणून कायम राहिल.', असे म्हणत त्यांनी असे सांगितलेकी, ते स्वतः आपला राजीनामा सादर करणार नाहीत. तर एका समर्थकामार्फत तो मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे पाठवतील.

'डी. के माझ्या घरी आले आणि म्हणाले होते की, एकदा का मी मुख्यमंत्री झालो की मी हे खाते सोडून देईन आणि तुम्ही ते घेऊ शकता.', असा दावा रामलिंगा रेड्डी यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, 'शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी ते शिवकुमार यांना भेटले होते आणि तेव्हाही त्यांना बंगळूरू विकास खाते त्यांनाच दिले जाईल असे सांगण्यात आले होते.'

८ वेळा आमदार राहिलेले रामलिंगा रेड्डी यांनी बंगळूर विकास खात्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही खाते स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, त्याऐवजी त्यांना मोठे आणि मध्यम सिंचन खाते देण्यात आले. ज्यामुळे कर्नाटक सरकारमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली. शिवकुमार यांनी अर्थ खाते कायम ठेवले असले तरी त्यांनी पूर्वी सांभाळलेले बंगळूर विकास खाते सोडले आहे. हे महत्त्वाचे खाते आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णा बायरे गौडा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कर्नाटक सरकारमधील सर्वात प्रतिष्ठित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण विभागांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा बंगळूर विकास विभाग राज्याच्या राजधानीतील नियोजन आणि पायाभूत सुविधांसाठी महत्वाचा मानला जातो.

बीटीएम लेआउटचे आमदार असलेले ७२ वर्षीय रामलिंगा रेड्डी हे सिद्धरामय्या सरकारमध्ये परिवहन आणि हिंदू धार्मिक आणि धर्मादाय मंत्री म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामलिंगा रेड्डी यांनी यापूर्वी गृहखातेही सांभाळले आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय कृष्णा बायरे गौडा यांच्याकडे आता राज्य सरकारमधील सर्वात प्रतिष्ठित पदांपैकी एक सोपवण्यात आले आहे. एक प्रमुख वोक्कालिगा नेते असलेले गौडा हे एका सुप्रसिद्ध राजकीय घराण्यातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT