Congress MLA Death Saam Tv
देश विदेश

Congress MLA Death: काँग्रेस आमदाराचे निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Politics: जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले. ४ वेळा आमदार राहिलेल्या पीरजादा मोहम्मद सईद यांचे रात्री उशिरा निधन झाले.

Priya More

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पीरजादा मोहम्मद सईद यांचे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचारादरम्यान त्यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दमहाल अचबल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पीरजादा मोहम्मद यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पीरजादा मोहम्मद सईद यांनी १९८७, २००२ आणि २००८ मध्ये कोकरनागचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. २०२४ मध्ये त्यांनी अनंतनागमधून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजयी होऊन ते आमदार झाले. चार वेळा आमदार राहिलेल्या सईद यांनी २००२ ते २०१४ दरम्यान पीडीपी-काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले होते.

काँग्रेस कार्यकर्ते आणि जेकेपीसीसीचे माजी सरचिटणीस इरफान नकीब यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. इरफान नकीब यांनी इन्स्टाग्रामवर पीरजादा मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर करत लिहिले की,'आज आपण एक महान नेते, एक आदरणीय ज्येष्ठ सहकारी आणि एक मार्गदर्शक गमावले आहेत.'

तसंच, 'पीरजादा मोहम्मद सय्यद साहेब यांचे निधन ही एक अत्यंत दुःखद हानी आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांचे समर्पण, बांधिलकी आणि लोकसेवा व काँग्रेस चळवळीतील अमूल्य योगदान जवळून पाहिले आहे. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन, नम्रता आणि पक्षासोबतचा त्यांचा आयुष्यभराचा संबंध नेहमीच स्मरणात राहील.', असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार घेतील तो निर्णय मान्य; जिल्हाध्यक्षांचा सकारात्मक कल

गादी स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या सोपी पद्धत

Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...

Stray dog attack: भटक्या कुत्र्याला पाहून धावला, पण हार्ट अटॅकने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT