काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग|VIDEO

Vijay Wadettiwar Meets Eknath Shinde Latest News: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून राजकीय भूकंपाचे भाकीत केले जात आहे. तर राष्ट्रवादी विलिनीकरणाची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच डिलीमीटेशनच्या मुद्यावरून पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वडेट्टीवार यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांना भेटीसाठी वेळ दिली होती. त्यानुसार वडेट्टीवार यांनी शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. आपण केवळ आपल्या मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.