PM Modi Speech Saam Tv
देश विदेश

PM Modi Speech: लाल किल्ल्यावरील भाषणात PM मोदींचाच सर्वाधिक रेकॉर्ड; आजचं भाषण किती मिनिटांचं?

Independence Day Speech 2023 :नरेंद्र मोदींनी आतापर्यंत १० वेळा लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनी भाषण केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Independence Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन दहाव्यांदा देशाला संबोधित केलंय. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत १० वेळा लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र दिनी भाषण केलं आहे. या काळात ५६ मिनिटांचे भाषण हे सर्वात लहान भाषण होते.

आज भारत देश ७७ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलंय. मोदींनी यंदा तब्बल दिड तास भाषण केलं आहे. अशात या बातमीतून मोदींच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डब्रेक भाषणांविषयी जाणून घेऊ.

आतापर्यंतची पंतप्रधान मोदींची भाषणे

पंतप्रधान मोदींनी दहा वेळा स्वातंत्र्य दिनी भाषण केली आहेत. या काळात फक्त एकदाच त्यांनी एका तासापेक्षा कमी वेळ संबोधित केलं होतं. २०१७ मध्ये स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे भाषण केवळ ५६ मिनिटांचे होते. ते त्यांचे सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेले भाषण होते.

कोणत्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी किती मिनिटे बोलले ?

२०१४ साली लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं होतं. तेव्हा त्यांनी एकूण ६५ मिनिटे भाषण केलं. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी ८६ मिनिटे देशाला संबोधित केले होते. ७० व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन ९४ मिनिटे भाषण केले होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात लाल किल्ल्यावरुन केलेले हे प्रदीर्घ भाषण आहे.

पंतप्रधान मोदींनी २०१७मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ५७ मिनिटे, २०१८ मध्ये ८२ मिनिटे तर २०१९ मध्ये ९२ मिनिटे देशाला संबोधित केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी २०२० मध्ये ८६ मिनिटे आणि २०२१ मध्ये ८८ मिनिटांचं भाषण झालं होतं. २०२२ मध्ये ८३ मिनिटे त्यांनी देशाला संबोधित केलं होतं.२०२३ मध्ये पंतप्रधान मोदींनी देशाला ९० मिनिटे संबोधित केले.

२०१५ मध्ये नेहरुंचा विक्रम मोडला

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ मिनिटे भाषण करुन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडला होता. नेहरुंनी १९४७ मध्ये लाल किल्ल्यावरुन ७२ मिनिटे भाषण केले होते.

या पंतप्रधानांनी कधीच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला नाही

भारताच्या दोन पंतप्रधानांना कधीच तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर या दोन पंतप्रधानांना कधीच लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधण्याची संधी मिळाली नाही. गुलझारजी नंदा हे १३-१३ दिवस दोनदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले. त्यांचा संपूर्ण पंतप्रधानपदाचा कार्यकाळ २६ दिवसांचा होता. याचबरोबर चंद्रशेखर यांनाही तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला नाही. त्यांचा पंतप्रधानांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ पर्यंत होता.

कोणत्या पंतप्रधानांनी किती वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला?

अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दित ६ वेळा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवला. राजीव गांधी आणि नरसिंद राव यांनी प्रत्येकी पाच वेळा ध्वज फडकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वेळा तर मोररजी देसाई यांनी दोनदा देशाला संबोधित केले. चौधरी चरणसिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, एचडी देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांनी प्रत्येकी एक वेळा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT