PM Narendra Modi Speech: युवांचा देश भारत! आता थांबायचं नाही... स्वातंत्र्यदिनी PM मोदींचा तरुणांना संदेश; भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

77th Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना देशातील तरुणाईला खास संदेश दिला.
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi SpeechSaamtv
Published On

PM Narendra Modi Speech On Independence Day: आज भारत देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन. देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना खास संदेश देत पुढील १००० वर्षाच्या वाटचालीवर भाष्य केले.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Speech: भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींचे मणिपूर हिंसाचारावर भाष्य; म्हणाले, काही दिवसांपासून सातत्याने...

भाषणाच्या सुरूवातीलाच मणिपूरवर भाष्य...

आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले. "मणिपूरमध्ये (Manipur) काही दिवसांपूर्वी हिंसाचार सुरू होता. मात्र काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत. संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. लोकांनी शांततेत आणि उत्साहाने स्वातंत्र्य उत्सव पुढे न्यावा. शांततेनेच सर्व प्रश्नांवर मार्ग निघेल. केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील... असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देश नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे...

'भारताच्या अमृतकालचे हे पहिले वर्ष आहे. आपण तारुण्यात जगत आहोत. आपण भारतमातेच्या कुशीत जन्म घेतला आहे. माझे शब्द लिहा, या काळात आपण जी पावले टाकू, आपण जे त्याग करू, जी तपश्चर्या करू. त्यातून येत्या एक हजार वर्षांचा देशाचा सुवर्ण इतिहास अंकुरणार ​​आहे. या काळात घडलेल्या घटना पुढील 1000 वर्षांसाठी प्रभाव निर्माण करतील. पंचप्राणात झोकून देऊन देश एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे..."

PM Narendra Modi Speech
Independence Day Wishes: देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार

अर्थव्यवस्थेत भारत आघाडीवर...

पीएम मोदी म्हणाले, "2014 मध्ये आपण जागतिक अर्थव्यवस्थेत 10 व्या क्रमांकावर होतो. आज आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. हे असेच घडले नाही. भ्रष्टाचाराने देश कोंडून ठेवला होता. मी 10 वर्षांचा हिशोब देशवासियांना देत आहे.

"यापूर्वी गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आज चार लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. गेल्या साडेपाच वर्षात 13.50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले.." असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi Speech
Indian Independence Day: राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

पंतप्रधान मोदींचा तरुणांना खास संदेश...

पंतप्रधान म्हणाले की, भारत मॉं जागृत झाल्याचे मला स्पष्टपणे दिसत आहे. जगभर भारताच्या चेतनेमध्ये आणि संभाव्यतेमध्ये एक नवीन आकर्षण, एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे, तो जगामध्ये स्वतःसाठी एक प्रकाश पाहत आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या काही गोष्टी आपल्यासाठी भाग्यवान आहेत. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल. आता थांबायचं नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढील 1000 वर्षावर भाष्य..

"मी 1000 वर्षांपूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावलं उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या 1000 वर्षावर प्रभाव पडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले."

(Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com