Independence Day 2023: स्वातंत्र्यानंतर 76 वर्षात भारत कसा बदलला? सोनं, साखर, दूध, आंतराष्ट्रीय व्यापार, जीडीपीमध्येही मोठे बदल

Happy Independence Day 2023 : भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे.
Gold, Yavatmal , Crime News
Gold, Yavatmal , Crime NewsSaam tv
Published On

August 15 Independence Day : देश आज 77वा स्वातत्र्यंदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होत आहेत. या 76 वर्षांत भारताने मोठी उंची गाठली आहे. जगात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदल्या जगासोबत भारताने आपलं सामर्थ्य जगासमोर ठेवलं आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे.

मात्र स्वातंत्र्यानंतरच्या 76 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तुमच्या वापरातल्या अनेक गोष्टींत स्वातंत्र्यानंतर अनेक बदल दिसून आले आहेत . याबद्दल आज जाणून घेऊया.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा जीडीपी 2.7 लाख कोटी रुपये होता आणि तो जगाच्या जीडीपीच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी होता. तर आज, 2023 मध्ये, देशाचा जीडीपी सुमारे 272.41 लाख कोटी रुपये आहे. (Latest Marathi News)

1960 ते 2021 या कालावधीतील जीडीपी वाढ पाहिली तर 1966 पूर्वी जीडीपी सरासरी चार टक्के दराने वाढला होता. 2015 पासून, जीडीपी वाढीचा दर सतत सहा टक्क्यांहून अधिक आहे. भारताचा साक्षरता दर 1947 मध्ये सुमारे 12 टक्के होता, आज तो 75 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार

  • 1950-51 मध्ये भारताने 1.27 अब्ज डॉलरची आयात केली आणि 1.26 अब्ज डॉलरची निर्यात केली.

  • 1975-76 मध्ये 6.08 अब्ज डॉलरची आयात आणि 4.66 अब्ज डॉलरची निर्यात केली.

  • 1990-91 मध्ये 24 अब्ज डॉलरची आयात आणि 18 अब्ज डॉलरची निर्यात केली.

  • 2002-03 मध्ये 50 अब्ज डॉलरची आयात आणि 44 अब्ज डॉलरची निर्यात केली.

  • 2021-22 मध्ये भारताने एकूण 670 अब्ज डॉलरची आयात केली, तर 756 अब्ज डॉलरची निर्यात केली.

सोने

सोनं 1947 मध्ये 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. सोनं सध्या 58,903 प्रति 10 ग्रॅम आहे.

पेट्रोल

पेट्रोल 1947 मध्ये प्रति लीटर 27 पैसे होते. जे सध्या 96.72 रुपये आहे.

तांदूळ

तांदूळ 1947मध्ये प्रति किलो 12 पैसे होता. सध्या तांदूळ सरासरी 41.58 रुपये प्रति किलो आहे.

साखर

साखरेची किंमत 1947मध्ये प्रति किलो 40 पैसे होती जी सध्या सरासरी 43 रुपये प्रतिकिलो आहे.

दूध

दूधांची किंमत 1947 मध्ये एक लीटरसाठी 12 पैसे होती, जी सध्या 58.09 रुपये प्रति लीटर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com