Amrit Bharat Express x
देश विदेश

Amrit Bharat Express : देशात ४ नवीन अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन धावणार, कुठे-कुठे थांबणार? तिकीट किती? वाचा संपूर्ण माहिती

Amrit Bharat Express News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ४ नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. नव्या मार्गाचा लोकार्पणाच्या कार्यक्रमात एक्स्प्रेसबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.

Yash Shirke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१८ जुलै) बिहारमध्ये चार नव्या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांचे उद्घाटन केले. या नवीन एक्स्प्रेस गाड्यांमुळे देशातील उत्तर आणि पूर्व भागातील वाहतूक वाढेल अशी सरकारला आशा आहे. या सेवांचा उद्देश प्रादेशिक जोडणी सुधारण्याचा आणि बिहार तसेच आसपासच्या राज्यांतील नागरिकांना किफायतशीर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणे असा आहे.

बिहारमधील मोतिहारी येथे पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी ७,२००० कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये चार नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या मार्गांची घोषणा -

१. राजेंद्र नगर टर्मिनल (पाटणा) ते नवी दिल्ली

२. बापुधाम मोतिहारी ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली)

३. दरभंगा ते लखनऊ (गोमती नगर)

४. मालदा टाउन ते लखनऊ (गोमती नगर) मार्गे भागलपूर

पटना-नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस वेळापत्रक

पटना-नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22361/22362) ३१ जुलै २०२५ पासून रोजची नियमित सेवा सुरू करणार आहे.

- ट्रेन क्रमांक 22361 राजेंद्र नगर टर्मिनलवरून दररोज संध्याकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.

- ट्रेन क्रमांक 22362 परतीच्या मार्गासाठी १ ऑगस्टपासून नवी दिल्लीहून संध्याकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता राजेंद्र नगर टर्मिनलला पोहोचेल.

मार्गिका आणि थांबे

पटना आणि नवी दिल्ली दरम्यान चालणारी अमृत भारत एक्स्प्रेस गाझियाबाद, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, गोविंदपुरी, पटना, दानापूर, आरा, दुबेदारगंज आणि बक्सर या स्थानंकावर थांबेल.

कोचची रचना

१. ८ स्लीपर क्लास कोच

२. ११ सामान्य (अनारक्षित) कोच

३. २ सामान-कम-ब्रेक व्हॅन

४. १ पेंट्री कार

तिकीटदर

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, पटना-नवी दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेसचे स्लीपर क्लासचे भाडे ५६० रुपये आहे. त्याच मार्गावर चालवल्या जाणाऱ्या इतर गाड्यांच्या भाड्यांच्या तुलनेत अमृत भारत एक्स्प्रेसचे तिकीट किंचित जास्त आहे. इतर गाड्यांच्या स्लीपर क्लासचे तिकीट सरासरी ५२० रुपये आहे.

पटना ते नवी दिल्ली मार्ग हा या कॉरिडॉरवरील पहिली अमृत भारत रेल्वेसेवा असणार आहे, यामध्ये खालील मार्गांचा समावेश असेल.

१. दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली)

२. मालदा टाउन ते एसएमव्हीटी बेंगळुरू

३. मुंबई एलटीटी ते सहरसा

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. यात

१. बापुधाम मोतिहारी ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली)

२. दरभंगा ते लखनऊ (गोमती नगर)

३. मालदा टाउन ते लखनऊ (गोमती नगर) भागलपूर मार्गे

या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT