Full route and schedule of Meerut to Varanasi Vande Bharat Express via Ayodhya : उत्तर प्रदेशमधील मेरठ ते वाराणसी या दोन शहरांना जोडण्यासाठी आता थेट रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या दोन शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन अयोध्या मार्गे धावणार आहे. त्यामुळे आता अयोध्याला थेट वंदे भारत एक्सप्रेसने जाता येणार आहे. मेरठ आणि वाराणसीच्या लोकांसाठी ही एक मोठी सुविधा मानली जात आहे. मेरठ-दिल्ली दरम्यान आधीच रॅपिड रेल (RRTS) आणि मेरठ मेट्रो आहे, आता धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. मेरठ-लखनऊ वंदे भारत एक्स्प्रेस आता अयोध्या धाम मार्गे वाराणसी कॅन्टपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.
२७ ऑगस्टपासून मेरठ ते वाराणसी या दोन शहरांच्या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे मेरठ आणि पूर्वांचलमधील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. पूर्वांचलमधून मेरठ आणि दिल्लीला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. मेरठमधील लोकांना काशी आणि अयोध्या येथे दर्शनासाठी सहज पोहोचता येईल.
उत्तर प्रदेशमधील रेल्वेच्या लखनौ विभागानुसार, ट्रेन क्रमांक 22490 वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6:35 वाजता मेरठहून निघेल आणि मुरादाबाद (8:40), बरेली (10:11), लखनऊ (1:55), अयोध्या धाम (3:55) मार्गे संध्याकाळी 6:25 वाजता वाराणसी कॅन्टला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक 22489 वाराणसी कॅन्टवरून सकाळी 9:10 वाजता निघेल आणि अयोध्या (11:40), लखनऊ (1:30), बरेली (5:15), मुरादाबाद (6:50) मार्गे रात्री 9:05 वाजता मेरठला पोहोचेल.
या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाचे दर अद्याप समोर आलेले नाहीत. पुढील काही दिवसांत तिकिटाचे दर समोर येतील.
मेरठ आणि वाराणसी या दोन शहरांमध्ये ७८३ किमीचे अंतर आहे. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर फक्त १२ तासात पूर्ण करणार आहे. सध्या या प्रवासासाठी १८ ते २० तास वेळ लागतो. पण वंदे भारत एक्स्प्रेसमुळे वेळ वाचणार आहे. आतापर्यंत मेरठ ते वाराणसीसाठी थेट रेल्वे सेवा नव्हती. प्रवाशांना प्रयागराज किंवा गाझियाबाद मार्गे प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ जास्त लागत होता. आता थेट रेल्वे सुरू झाल्याचा फायदा होऊ शकतो. व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना दोन शहरांमध्ये प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे.
मेरठ-काशी सेवा ही वाराणसीसाठी सातवी वंदे भारत ट्रेन असेल. सध्या वाराणसीहून रांची, देवघर, पाटणा आणि नवी दिल्लीसाठी वंदे भारत सेवा सुरू आहेत. बनारस स्थानकावरून आग्र्यासाठीही एक वंदे भारत ट्रेन आहे. या नव्या सेवेमुळे प्रवाशांमध्ये उत्साह आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.