देश विदेश

मोठी बातमी! भारतात आणखी एक विमान अपघात, उड्डाण घेतल्यानंतर एअर अ‍ॅम्बुलन्स जमिनीवर कोसळलं

jharkhand ranchi plane crash : भारतात आणखी एक विमान अपघात घडला आहे. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

झाखंडच्या रांचीत एअर अॅम्बुलन्स क्रॅश

एअर अॅम्बुलन्समध्ये होते ७ जण

एअर अॅम्बुलन्समधील रुग्णाचा मृत्यू

झारखंडमधील रांची विमानतळाहून उड्डाण घेतलेलं एअर अॅम्बुलन्स क्रॅश झालं आहे. या एअर अॅम्बुलन्समध्ये एकूण ७ जण होते. या एअर अॅम्बुलन्समधून कुटुंबातील आजारी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने दिल्ली नेले जातं होते. विमानाचा उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांनी संपर्क तुटला. त्यानंतर एअर अॅम्बुलन्स हे एका जंगलात कोसळल्याची माहिती हाती आली.

एअर अॅम्बुलन्समधील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच रुग्णाला एअर अॅम्बुलन्समधून उपचारासाठी नेलं जात होतं. संजय कुमार असे ४१ वर्षीय रुग्णाचे नाव होतं. आगीत होरपळलेल्या रुग्णाला उपचारासाठी दिल्लीला नेले जात होते. परंतु या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच चतरा जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले. झारखंड सरकार आणि 'डीजीसीए'ने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी तयारी सुरू केली आहे. या विमानात एक रुग्ण, १ डॉक्टर, १ पॅरामॅडिक, २ अटेंडेंट , १ मुख्य पायलट आणि १ को-पायलट असे मिळून ७ जण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचं बीचक्राफ्ट C90 एअरक्राफ्ट VT-AJV एअर एम्बुलन्स हे रांचीहून दिल्लीला जात होतं. उड्डाण घेतल्यानंतर झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कसारिया गावात कोसळलं. या विमानात २ क्रू मेंबरसहित ७ जण होते.

एअर एम्बुलन्सने सायंकाळी ७.११ वाजता रांचीतून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर कोलकाताहून सुरू असलेला एअर एम्बुलन्सचा संपर्क हा सायंकाळी ७.३४ मिनिटाला तुटला. या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाचं शोध आणि बचाव पथक आणि AAIB टीम तपासासाठी पाठवण्यात येत आहे.

चतराचे पोलीस अधिकारी सुमित अग्रवाल यांनी सांगितलं की, आम्हाला ग्रामस्थांनी अपघात झाल्याची सूचना दिली. त्यानंतर आमचं पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिसराचा आढावा घेऊन सविस्तर माहिती देऊ. एअर एम्बुलन्स एका घनदाट जंगलात कोसळलं. त्या ठिकाणी पोहोचणं देखील माोठं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT