

मेळघाटात पिकअप वाहन ५० फूट दरीत कोसळलं
भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू
अपघातानंतर बचावकार्य तातडीने सुरू
अमर घटारे, साम टीव्ही
राज्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे. अमरावतीत रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. अमरावतीतील मेळाघाटातील राणी गाव घाटात पिकअप उलटून ५० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअपमधील प्रवाशांची एकच धावाधाव झाली.
अपघात नेमका कसा घडला?
ओडिशामध्ये पाच जणांच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असताना राज्यातील अमरावतीच्या माळघाटात भीषण अपघाताची घटना घडली. मेळघाट परिसरात मजुरांना घेऊन जाणारा पिकअप उलटला.मेळघाट परिसरात राणीघाटजवळ पिकअप वाहन दरीत उलटल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातात ५ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर काही मजूर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळता पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी मजूरांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पिकअप ५० फूट दरीत कोसळल्याने पोलीस आणि स्थानिक नागरिकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या.परंतु मोबाईल आणि टॉर्चच्या प्रकाशात वाट शोधत अपघातस्थळी पोहोचले.
पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने १० ते १२ जखमींना मदत करत त्यांना रुग्णालयात नेलं. अपघातामुळे रस्त्यावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवली. अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अपघातातील मृतांचा नावे अद्याप समोर आलेली नाही. अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.