Amit shah On Parliament Security Breach Saam Tv
देश विदेश

Parliament Security Breach : 'ही गंभीर बाब आहे, विरोधक राजकारण करत आहेत', अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं

Satish Kengar

Amit shah On Parliament Security Breach:

विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावर निवेदन द्यावे आणि त्यानंतर दोन्ही सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच अमित शाह यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह म्हणाले आहेत की, ही गंभीर बाब असून लोकसभा अध्यक्षांनी त्याची दखल घेतली आहे. ते म्हणाले की, विरोधक राजकारण करत आहेत. शाह म्हणाले, "चुकी झाली आहे, यामुळे ही घटना घडली आहे. गृह मंत्रालयाने वरिष्ठ डीजीपीच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपासही सुरू आहे. 15-20 दिवसात अहवाल येईल."  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आज तक'शी बोलताना अमित शाह म्हणाले की, या समितीला घटनेचा तपास आणि सुरक्षा व्यवस्था काशी सुधारायची याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते म्हणाले की, अनेक वेळा घुसखोर सुरक्षेत नवीन त्रुटी शोधत राहतात. याला राजकीय मुद्दा बनवू नये.  (Latest Marathi News)

दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाबाबत बैठक घेऊन सरकारला कारवाई करण्याचे आवाहन केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर निवेदन द्यावं आणि या विषयावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणाऱ्या व्यक्तीला पास देण्याची शिफारस करणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही विरोधी पक्षांची मागणी आहे.

नवीन संसद भवनातील सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचा आरोपही अनेक खासदारांनी केला. बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहात उडी मारली आणि स्मोक कँडल पेटवत धूर केला. त्यानंतर लगेचच दोघांनाही पकडण्यात आले.

तृणमूल काँग्रेसचे लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, गृहमंत्र्यांनी संसदेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. ते म्हणाले की, ''अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जर संसदेच्या सुरक्षेचा भंग होत असेल तर देश सुरक्षित कसा राहील?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT