Lok Sabha News: विरोधी पक्षाचे खासदार संसदेत नव्हते, तरी केलं निलंबित; नंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण

Loksabha MP's Suspended: संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून सभागृहात गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेससह अनेक विरोधी खासदारांना गुरुवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले.
SR Parthiban
SR ParthibanSaam Tv

Loksabha MP's Suspended:

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून सभागृहात गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेससह अनेक विरोधी खासदारांना गुरुवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. यामध्ये विरोधी पक्षाच्या एका अशा खासदारालाही निलंबित करण्यात आले, जे संसदेत उपस्थितही नव्हते. ते त्यावेळी चेन्नईत होते.

याचबद्दल सरकारने नंतर स्पष्टीकरण दिले की, द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचे नाव चुकून निलंबित खासदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. नंतर त्यांचे नाव काढून टाकण्यात आले, त्यानंतर एकूण निलंबित खासदारांची संख्या 13 झाली आहे. या सर्वांना सभागृहातील बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SR Parthiban
Vande Bharat Train: मुंबई -जालना - कोल्हापूर प्रवास होणार जलद? राज्याला मिळणार आणखी नवीन वंदे भारत ट्रेन?

निलंबित खासदारांच्या यादीत पार्थिवन यांचे नाव आल्यानंतर द्रमुकच्या खासदारांनी याबाबत तक्रार केली होती. एसआर पार्थिवन सभागृहात नसून ते चेन्नईत असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. (Latest Marathi News)

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “काल लोकसभेत जे घडले ते अत्यंत चिंताजनक होते. आज लोकसभेत जे घडले ते अत्यंत विचित्र आहे. तामिळनाडूतील एक खासदार, जे सभागृहात उपस्थित नव्हते आणि ते नवी दिल्लीबाहेर होते, त्यांना कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल निलंबित करण्यात आले. दरम्यान, घुसखोरांना मदत करणाऱ्या भाजप खासदाराला कोणतेही परिणाम भोगावे लागणार नाहीत.''

SR Parthiban
Mumbai Viral Video: लग्नाचं दिलं वचन अन् केला दगा! तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आज निलंबित लोकसभा सदस्यांच्या यादीतून पार्थिवन यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. सदस्याची ओळख पटवण्यात कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. जोशी म्हणाले, "मी लोकसभा अध्यक्षांना चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याने सदस्याचे नाव मागे घेण्याची विनंती केली आहे." मी लोकसभा अध्यक्षांना सदस्याचे नाव मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांची ओळख पटवण्यात चूक झाली होती.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com