मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर हे फोटो अपलोड करण्यात आले होते. दिलदार खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम (Instagram Viral Video) या साइटवर आरोपीची तरुणीसोबत ओळख झाली हाती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला विश्वासात घेऊन आरोपीने विवस्त्र अवस्थेत तरुणीला विवर व्हिडीओ कॉल (Viral Video Call) करण्यास भाग पाडले व त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर बोगस अकाउंट करून वायरल केला. (Latest Marathi News)
याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिलदार खान याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे.
दरम्यान, बीडमध्येही असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका शाळेत शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शिक्षक आणि शिक्षिका शाळेच्या आवारातच अश्लील कृत्य करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालिकांनी आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकार घडल्यानंतर याची माहिती आधीच शाळेच्या शिपायाने अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्याआधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात 9 डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.x
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.