Antarwali Sarathi News : मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेंना जामीन मंजूर! मात्र बीड -जालना जिल्ह्यात नो एन्ट्री

Rushikesh Bedre : अंतरवली सराटे येथील हिंसाचार प्रकरणांमध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे यांच्यासह अन्य तिन जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. आज औरंगाबाद हायकोर्टाकडून ऋषिकेश बेद्रे यांना अटी शर्तीवर जामीन देण्यात आला आहे.
Rushikesh Bedre
Rushikesh BedreSaam Tv
Published On

Antarwali Sarathi Lathicharge case :

अंतरवली सराटे येथील हिंसाचार प्रकरणांमध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे यांच्यासह अन्य तिन जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. आज औरंगाबाद हायकोर्टाकडून ऋषिकेश बेद्रे यांना अटी शर्तीवर जामीन देण्यात आला आहे.

यामध्ये ऋषिकेश बेद्रे यांना बीड आणि जालना जिल्ह्यात पुढील 90 दिवस येण्यास बंदी असणार आहे. जर बेंद्रे यांना बीड किंवा जालना जिल्ह्यातील एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा असेल, तर पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊनच त्यांना यावं लागणार आहे, या अटीवर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rushikesh Bedre
Who is Lalit Khaitan: वयाच्या 80 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत झाले सामील, जाणून घ्या कोण आहेत ललित खेतान?

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. या संपूर्ण वादग्रस्त प्रकार १ सप्टेंबर २०२३ रोजी घडला हित. याप्रकणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांना पोलिसांनी अटक केली होती. (Latest Marathi News)

बेद्रे यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. ते मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होते. १ सप्टेंबरच्या दुपारी अंतरवाली सराटी गावात पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ही घटना घडून गेल्यानंतर मधल्या काळात राजकारण बरंच तापलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनाप्रकरणावरुन माफीही मागितली होती. तसंच जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदलीही करण्यात आली होती.

Rushikesh Bedre
Maratha-OBC Reservation : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा; मागासवर्ग आयोगात याचिका

याच दरम्यान बेद्रे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे गावठी पिस्तुलही आढळून आली होती, असं सांगण्यात येत आहे. मात्र आता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com