Who is Lalit Khaitan: वयाच्या 80 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत झाले सामील, जाणून घ्या कोण आहेत ललित खेतान?

Radico Khaitan Company's Chairman Lalit Khaitan's Net Worth: भारतातील अब्जाधीशांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते नाव आहे ललित खेतान यांचं. वयाच्या 80 व्या वर्षी ललित खेतान हे भारताच्या नव्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.
Radico Khaitan Company's Chairman Lalit Khaitan Become New Billionaire of India Know About Him in Marathi
Radico Khaitan Company's Chairman Lalit Khaitan Become New Billionaire of India Know About Him in MarathiSaam Tv
Published On

Lalit Khaitan Become New Billionaire of India:

भारतातील अब्जाधीशांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते नाव आहे ललित खेतान यांचं. वयाच्या 80 व्या वर्षी ललित खेतान हे भारताच्या नव्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. भारतातील सर्वात नवीन अब्जाधीश म्हणून फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव आले आहे.

फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत त्यांचं नाव आल्यानंतर बऱ्याच लोकांना ते कोण आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आपण ललित खेतान हे कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे? ते नेमका कोणता उद्योग करतात, अब्जाधीश होण्याचा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे, हे जाणून घेणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Radico Khaitan Company's Chairman Lalit Khaitan Become New Billionaire of India Know About Him in Marathi
Maratha-OBC Reservation : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा; मागासवर्ग आयोगात याचिका

भारतातील सर्वात नवीन अब्जाधीश ललित खेतान (Lalit Khaitan Net Worth) हे 380 मिलियन डॉलर्स रेव्हेन्यू असलेल्या रॅडिको खेतान या कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी जे प्रोडक्ट बनवते, त्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितीही असेल. खेतान कंपनी ही 8 पीएम व्हिस्की, मॅजिक मोमेंट्स वोडका, ओल्ड अॅडमिरल ब्रँडी आणि रामपूर सिंगल माल्ट यांसारखे अल्कोहोलिक पेय बनवण्यासाठी ओळखली जाते. (Latest Marathi News)

या वर्षी वाढत्या विक्रीनंतर आणि नवीन पेय हॅपीनेस इन अ बॉटल लॉन्च केल्यानंतर, या अल्कोहोल कंपनी रॅडिकोच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे खेतानच्या महसुलात प्रचंड वाढ झाली आहे, ज्यांचा त्यात 40 टक्के हिस्सा आहे.

Radico Khaitan Company's Chairman Lalit Khaitan Become New Billionaire of India Know About Him in Marathi
Gold Silver Rate Hike: सोनं १२०० रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरातही ३००० रुपयांची वाढ; चेक करा नवे दर

कशी झाली कंपनीची सुरुवात?

आज अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ललित खेतान यांना ही कंपनी त्यांच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 1970 मध्ये ललित खेतान यांचे वडील जीएन खेतान यांनी रामपूर डिस्टिलरी आणि केमिकल कंपनी खरेदी केली होती. 1995 मध्ये वडिलांच्या निधनानंतर ललित खेतान यांना ही डिस्टिलरीचा वारसा मिळाला.

रॅडिको खेतान ही भारतातील विदेशी मद्य उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीपैकी एक आहे. याला IMFL म्हणून ओळखले जाते. समोर आलेल्या माहितीनुसार, या कंपनीला प्रीमियम मल्टी सेगमेंटमधून 80 टक्के महसूल मिळत आहे. कंपनीचा महसूल वाढवण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com