Gold Silver Rate Hike: सोनं १२०० रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरातही ३००० रुपयांची वाढ; चेक करा नवे दर

Check Gold Price Price Today ( 14 December 2023) In Maharashtra: भारतीय सराफ बाजारात आज १४ डिसेंबरला सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात मागील आठ दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळाली परंतु, आज सोन्याचे भाव वाढले आहेत.
Gold Price Rate (14 December 2023) In Maharashtra
Gold Price Rate (14 December 2023) In MaharashtraSaam Tv
Published On

Why Is Gold Price Increasing In India :

भारतीय सराफ बाजारात आज १४ डिसेंबरला सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात मागील आठ दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळाली परंतु, आज सोन्याचे भाव वाढले आहेत.

जळगावाच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या (Gold) भावात 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची वाढ झाली. सोनं 62 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे भाव 75 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gold Price Rate (14 December 2023) In Maharashtra
Skin Care Tips : टाचांना सतत भेगा का पडतात? असू शकते Vitamins ची कमतरता, कशी घ्याल काळजी?

सोन्या चांदीचे भावात चढ उतार कायम पाहायला मिळाली. सोन्याच्या भावात एका दिवसात 1200 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात ३ हजार रुपयांनी (Money) वाढ झालेली पाहायला मिळाली.

Gold Price Rate (14 December 2023) In Maharashtra
Gold Silver Rate (14th December 2023): खरेदीदारांना पुन्हा झटका! सोने-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव किती?

मागच्या आठवड्यात ४ डिसेंबरला सोन्याने $2150 चा उच्चांक गाठून विक्रमी नोंद केली होती. अशातच आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना पुन्हा एकदा झटका लागला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,०४० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १०० ग्रॅमसाठी २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. मिस्ड कॉलद्वारे सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घ्या

२२ कॅरेट आणि १८ कॅरेटनुसार सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. काही वेळा तुम्हाला मेसेजद्वारे उपलब्ध होतील. भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com