Gold Silver Rate (14th December 2023): खरेदीदारांना पुन्हा झटका! सोने-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव किती?

Today's (14th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला की, सोन्या-चांदीच्या दरात गुंतवणूक केली जाते. अशातच मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला.
Gold Silver Rate (14th December 2023)
Gold Silver Rate (14th December 2023)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (14th December 2023):

सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला की, सोन्या-चांदीच्या दरात गुंतवणूक केली जाते. अशातच मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला.

४ डिसेंबरला सोन्याने $2150 चा उच्चांक गाठून विक्रमी नोंद केली होती. घसरणीनंतर आता $1975 वर येऊन पोहोचला आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी घसरण झाली होती तर अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना पुन्हा एकदा झटका लागला आहे.

Gold Silver Rate (14th December 2023)
Business Idea In Marathi : चमचमीत पदार्थ बनवता येताय? मग महिन्याला कमवू शकता लाखो रुपये; फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करा

ऐन खरेदीच्या काळात ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करावी की, नाही हा देखील प्रश्न पडला आहे. सोन्याच्या (Gold) भाव घसरले की, पुन्हा वाढेल यामुळे टेन्शन देखील आले आहे. सराफा बाजारातील व्यापारांनी सांगितले की, येत्या वर्षात सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊ शकते. मौल्यवान धांतूच्या फ्युचर्स किमतीत तेजीचा व्यवहार सुरु आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,०४० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १०० ग्रॅमसाठी २५० रुपयांनी वाढ झाली आहे.(Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,८९० रुपये

  • पुणे - ६२,८९० रुपये

  • नागपूर - ६२,८९० रुपये

  • नाशिक - ६२,९२० रुपये

  • ठाणे - ६२,८९० रुपये

  • अमरावती - ६२,८९० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com