Maratha-OBC Reservation : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा; मागासवर्ग आयोगात याचिका

OBC Reservation: एक बातमी समोर आली आहे. राज्यातील मराठ्यांना इतर मागासवर्गातमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Maratha-OBC Reservation
Maratha-OBC Reservation Saam Tv
Published On

>> प्रमोद जगताप

Maratha-OBC Reservation :

एक बातमी समोर आली आहे. राज्यातील मराठ्यांना इतर मागासवर्गातमध्ये (Obc Reservation) समाविष्ट करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील राजसाहेब पाटील यांनी ही याचिका दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत माहिती देताना राजसाहेब पाटील म्हणाले, ''राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासमोर आम्ही याचिका दाखल केली आहे. ते आम्हाला नियमानुसार सुनावणीसाठी बोळवतील.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha-OBC Reservation
CM On Old Pension: जुन्या पेन्शनबाबत मोठी अपडेट; विधीमंडळात CM शिंदेंची महत्त्वाची माहिती

ते म्हणाले, ''आम्ही विभागवार कागदपत्र त्यांच्यासमोर मांडली आहेत. मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्या नोंदी असणारी कागदपत्र आम्ही आयोगासमोर समोर ठेवली. महाराष्ट्रातील सगळा मराठा समाजाला ओबिसित समावेश करावा ही मागणी केली आहे. जे आरक्षणापासून वंचित राहिले आहेत, त्यांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आयोग त्यांच्या केंद्र सूचित नोंद करुन घेईल, अशी अपेक्षा आहे. मराठ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' (Latest Marathi News)

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी हे मागील महिन्यात उपोषणाला बसले होते. मात्र सरकारने त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.

Maratha-OBC Reservation
Royal Enfield Shotgun 650: बाजारात धिंगाणा! आली नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650; जाणून घ्या किंमत

यादरम्यान ते राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 24 डिसेंबर रोजी आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यास त्यांनी सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com