CM On Old Pension: जुन्या पेन्शनबाबत मोठी अपडेट; विधीमंडळात CM शिंदेंची महत्त्वाची माहिती

Eknath Shinde Provided Important Update on Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या योजनेविषयी मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिलीय.
Eknath Shinde on Old Pension Scheme
Eknath Shinde on Old Pension SchemeSaam Tv
Published On

CM Shinde on Old Pension Scheme:

जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी करत राज्यात ठिकठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जुनी पेन्शन योजनेविषयी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत जुनी पेन्शनचं निवदेन मांडलं. पेन्शन योजना अंतिम टप्प्यात आली आहे. याचा प्रस्ताव अर्थसंकल्पाच्या सत्रात मांडला जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. (Latest News)

Eknath Shinde on Old Pension Scheme
Vastu Tips : घरातल्या या ठिकाणी चुकूनही ठेवू नका घड्याळ, सतत भासेल पैशांची चणचण

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या आंदोलनाला शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा निवेदन मांडले. सरकार सकारात्मक असून योजनेसाठी स्थापित करण्यात आलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

Eknath Shinde on Old Pension Scheme
Maratha-OBC Reservation : महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा; मागासवर्ग आयोगात याचिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com