Vande Bharat Train: मुंबई -जालना - कोल्हापूर प्रवास होणार जलद? राज्याला मिळणार आणखी नवीन वंदे भारत ट्रेन?

Mumbai-Pune Vande Bharat Train: देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यातच आता केंद्र सरकार अधिकाधिक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची तयारी करत आहेत.
Vande Bharat Express News
Vande Bharat Express NewsSaam TV
Published On

Mumbai-Pune Vande Bharat Train:

देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यातच आता केंद्र सरकार अधिकाधिक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून अनेक शहरे या ट्रेनच्या माध्यमातून जोडली जातील आणि लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होऊ शकेल.

आता देशभरात 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. यातील एक ट्रेन सिकंदराबाद ते पुणे दरम्यानही धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेला ही ट्रेन मिळणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vande Bharat Express News
Mumbai Viral Video: लग्नाचं दिलं वचन अन् केला दगा! तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत सध्या चार वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत गाड्या उपलब्ध झाल्यास सर्व श्रेणीतील प्रवाशांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत एकूण 33 गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या सध्या देशभरातील विविध शहरे आणि राज्यांदरम्यान धावत आहेत. (Latest Marathi News)

तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, याशिवाय मुंबई-कोल्हापूर, मुंबई-जलाना, पुणे-वडोदरा, वाराणसी-लखनौ, पाटणा-जलपाईगुडी, मडगाव-मंगळूर, दिल्ली-अमृतसर, इंदूर-सुरत, टाटानगर-वाराणसी दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन धावू शकतात.

Vande Bharat Express News
Antarwali Sarathi News : मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेंना जामीन मंजूर! मात्र बीड -जालना जिल्ह्यात नो एन्ट्री

दरम्यान, पहिली वंदे भारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान सुरू करण्यात आली होती. या रेल्वेचा या मार्गावरील लाखो प्रवाशांना फायदा झाला आहे. आता असे सांगणात येत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करू शकतात. दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल.

वंदे भारत लवकरच जम्मू-काश्मीरमध्येही धावणार?

लवकरच वंदे भारत ट्रेन जम्मू-काश्मीरमध्येही धावू शकते. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाने मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेसला जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) मार्गावर धावण्यासाठी आठ डबे निश्चित केले आहेत. यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार काश्मीरला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाची घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले असून काही बोगद्यांचे अंतिम टप्प्याचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com