Parle G Biscuits  x
देश विदेश

Viral News : ५ रुपयांचा पारले जी २ हजारांना विकला जातोय, कुठे आणि कारण काय?

Parle G Biscuits : सोशल मीडियावर एका व्हायरल पोस्टची चर्चा आहे. ५ रुपये किंमत असलेले पारले जी बिस्किट दोन हजारांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात असल्याचे या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.

Yash Shirke

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 'पारले जी बिस्कीटे गाझा येथे २४ युरो म्हणजेच २,३४२ रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहेत. भारतात पाच किंवा दहा रुपयांना मिळाणाऱ्या पारले जी बिस्किटांची किंमत पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हायरल पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

मोहम्मद जवाद नावाच्या एका व्यक्तीने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, आज मला अखेर रविफचे आवडते बिस्किट मिळाले. या बिस्किटांची किंमत १.५ युरोवरून २४ युरो इतकी झाली असली, तरीही रविफला आवडतात म्हणून ही बिस्किट मी खरेदी केली आहे, असे जवादने म्हटले आहे. याआधी पारले जी बिस्किटांची किंमत १४६ रुपयांच्या आसपास होती. आतही ही किंमत २,३५१ रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा जवादने केला आहे.

महागाई आणि त्यामागील कारण

ऑक्टोबर २०२३ पासून गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु आहे. युद्धामुळे गाझामध्ये अन्नासह इतर जीवनावश्यक गोष्टींची कमतरता भासत आहे. २ मार्च ते १९ मे या कालावधीदरम्यान गाझापट्टीला पूर्णपणे नाकेबंदीचा सामना करावा लागला होता. नाकेबंदीमुळे या ठिकाणी मर्यादीत गोष्टी नेण्याची परवानगी होती. मर्यादित संस्थेने ट्रक जाऊ देण्यात आले होते.

गाझामध्ये अन्नपदार्थांची उपलब्धता कमी असल्याने काळाबाजार अगदी शिगेला पोहोचला आहे. मदत म्हणून मिळणारे फूड बॉक्स काळ्या बाजारात उच्च किमतीत विकले जात आहेत. भारतीय बाजारपेठेत फक्त ५ रुपये किंमत असलेल्या पालरे जी बिस्किटांची किंमत गाझामध्ये २,३०० रुपयांपेक्षा जास्त आहे. तेथे १ किलो साखरेची किंमक ४,९१४ रुपये आणि १ किलो बटाट्याची किंमत १,९६५ रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT