Dan Rivera mysterious death saam tv
देश विदेश

Dan Rivera mysterious death: पॅरानॉर्मल इन्वेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू; Most Haunted एनाबेल डॉलसोबत करायचे काम

Paranormal Investigator Dan Rivera Death: रहस्यमयी एनाबेल डॉल तुम्हाला सर्वांना माहिती असेल. या डॉलचं संपूर्ण काम पाहणाऱ्या पॅरानॉर्मल इन्वेस्टर डॅन रिवेरा यांचं अचानक निधन झालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पॅरानॉर्मल इन्वेस्टर म्हणून क्षेत्रात प्रसिद्ध असलेले आणि न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च (NESPR) चे वरिष्ठ संशोधक डॅन रिवेरा यांचं 54व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी अमेरिकन लष्करातही सेवा दिली होती आणि त्यानंतर अलौकिक घटनांचा शोध घेणाऱ्या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पॅरानॉर्मल विश्वात खळबळ उडाली आहे.

‘डेव्हिल्स ऑन द रन’ टूर दरम्यान दुर्घटना

13 जुलै 2025 म्हणजेच रविवारी रात्री पेनसिल्व्हेनियामधील गेटीसबर्ग शहरातील सोल्जर्स नॅशनल ऑर्फनिज हाउसमध्ये आयोजित केलेल्या ‘Devils on the Run’ या टूरमध्ये डॅन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात हॉन्टेड मानली जाणारी एनाबेल डॉल देखील प्रदर्शनासाठी आणली गेली होती.

या टूर दरम्यान एका हॉटेलमध्ये डॅन अचानक बेशुद्ध झाले. घटनास्थळीच त्यांना CPR देण्यात आला. ही घटना घडल्यानंतर तातडीने वैद्यकीय पथक पोहोचलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अडम्स काउंटीच्या आपत्कालीन रेकॉर्ड्सनुसार, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लहानपणापासूनच होती रहस्यांबद्दल ओढ

डॅन रिवेरा यांना बालपणापासूनच भूत-प्रेत, आत्मा, अघोरी गोष्टी आणि अलौकिक शक्तींबाबत खूप कुतूहल होतं. याच ओढीमुळे त्यांनी या क्षेत्रात करिअर निवडलं. ते ट्रॅव्हल चॅनल वरील Most Haunted Places या कार्यक्रमात पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणून देखील लोकांच्या समोर आले होते. त्याप्रमाणे नेटफ्लिक्सवरील 28 Days Haunted या लोकप्रिय शोचे निर्मातेही होते.

या क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले आणि संशोधनात गंभीरता ठेवणारे काही मोजक्या लोकांपैकी डॅन हे एक होते. त्यांनी अलौकिक घटनांसंबंधित असंख्य केसेस हाताळल्या होत्या.

एनाबेल डॉलचं रहस्य

डॅन रिवेरा यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पुन्हा एकदा ‘एनाबेल डॉल’ला जबाबदार धरलंय. ही डॉल 1968 साली एका विद्यार्थिनीला भेट म्हणून दिली गेली होती. त्यानंतर तिच्या आजूबाजूला विचित्र आणि भयानक घटनांची मालिकाच सुरू झाली. त्या मुलीनं संपर्क साधल्यावर प्रसिद्ध पॅरानॉर्मल तज्ज्ञ एड आणि लॉरेन वॉरेन यांनी या डॉलची तपासणी केली.

या दोघांच्या मतानुसार, या डॉलमध्ये एखादी आत्मा वास करतेय. त्यांनी ही डॉल त्यांच्या खास Occult Museum मध्ये बंदिस्त करून ठेवल्याचं सांगितलं जातं. नंतर ही डॉल NESPRच्या देखरेखीखाली आली आणि तिचं सर्व काम डॅन रिवेरा स्वतः पाहत होते.

डॅन रिवेरांच्या मृत्यूवेळी डॉल कुठे होती?

डॅन रिवेरांच्या मृत्यूनंतर लोकांनी वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली. काहींनी ही ‘हॉन्टेड’ एनाबेल डॉल त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा दावा केलाय. परंतु, अडम्स काउंटीचे सहाय्यक कोरोनर यांनी स्पष्ट केलं की, मृत्यूच्या वेळी ही डॉल हॉटेलमध्ये नव्हती, ती सुरक्षितपणे व्हॅनमध्ये बंदिस्त ठेवलेली होती. त्यामुळे ही घटना आणि डॉल यांच्यात थेट संबंध असल्याचं कोणतंही अधिकृत विधान अद्याप झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

SCROLL FOR NEXT