Mysterious Road: तो रहस्यमयी रस्ता, जो केवळ २ तासच दिसतो; अचानक होतो गायब!

Mysterious Road: आज आम्ही तुम्हाला जगातील एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. युरोपियन देश फ्रान्समध्ये एक रहस्यमयी रस्ता आहे.
Mysterious Road
Mysterious Roadsaam tv
Published On

आपल्या जगात अशी अनेक रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून झालेला नाही. ही रहस्य उलगडण्यासाठी तज्ज्ञांनी अनेक प्रयत्न केलेत मात्र ते देखील यामध्ये अपयशी ठरल्याचं दिसून आलं. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला एका अनोख्या रस्त्याबद्दल सांगणार आहोत, जो दिसतो आणि स्वतःच गायब होतो. जाणून घेऊया हे रहस्य नेमकं काय आहे?

कुठे आहे हा रहस्यमयी रस्ता?

युरोपियन देश फ्रान्समध्ये हा रहस्यमयी रस्ता आहे. हा रस्ता असा आहे, ज्याचा वापर दररोज केला जातो. मात्र याचा वापर केवळ २ तासांसाठी केला जातो. यानंतर म्हणजेच 2 तासांनंतर रस्ता शोधणं अशक्य होते कारण तो अदृश्य होतो. हा रस्ता फ्रान्सच्या अटलांटिक किनाऱ्यावरील नॉयरमाउटियर बेटाला मुख्य भूभागाशी जोडतो.

Mysterious Road
Mysterious Story: 'या' भागात एलियन्सचा कहर! लोकांना किडनॅप करत असल्याचा स्थानिकांचा दावा

नेमकं काय आहे या रस्त्याचं रहस्य?

फ्रेंच भाषेत याला पॅसेज डू गोईस (Passage du Gois) असं म्हटलं जातं. याचा अर्थ म्हणजे शूज ओले करून हा रस्ता ओलांडणं. या रस्त्याची एकूण लांबी 4.5 किलोमीटर असून फ्रान्सच्या नकाशावर 1701 साली प्रथमच हा रस्ता दिसल्याची माहिती आहे. हा रस्ता ओलांडणं तेव्हा धोकादायक मानले जात होते कारण दिवसातून दोनदा हा रस्ता एक-दोन तासच दिसत होता. दोन्ही बाजूंच्या पाण्याची पातळी वाढल्याने हा दिसेनासा व्हायचा. वास्तविक, भरती-ओहोटीमुळे रस्ता बहुतांश वेळा पाण्यात बुडून जातो.

रस्ता ओलांडणं मानलं जातं कठीण

यापूर्वी मेनलँडवरून आयलँडपर्यंत जाण्यासाठी बोटीचा वापर केला जायचा. मात्र जेव्हापासून या ठिकाणी गाळ जमा होऊ लागला तेव्हा काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश वेळा हा रस्ता 13 फूट पाण्याने भरलेला असल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. 1986 मध्ये या ठिकाणी एक अनोखी शर्यत आयोजित केली जाऊ लागली आणि 1999 मध्ये, फ्रान्सच्या प्रसिद्ध सायकल शर्यती टूर डी फ्रान्ससाठी देखील या रस्त्याचा वापर केला गेला.

Mysterious Road
Mysterious footprints: वाळवंटात अचानक दिसले रहस्यमयी पायांचे ठसे; वैज्ञानिकही या गोष्टीमुळे हैराण

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com