Mysterious footprints: वाळवंटात अचानक दिसले रहस्यमयी पायांचे ठसे; वैज्ञानिकही या गोष्टीमुळे हैराण

Mysterious footprints: आपल्या संपूर्ण जगात अशी अनेक रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून झाला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत.
Mysterious footprints
Mysterious footprintssaam tv
Published On

आपल्या संपूर्ण जगात अशी अनेक रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून झाला नाही. या रहस्यांचा अनेक तज्ज्ञांनी अभ्यास केला, मात्र त्यांनाही याचं गूढ उकलणं शक्य झालं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. ही गोष्ट एका वाळवंटाची असून या ठिकाणी लाखो गोलाकार पायांचे ठसे दिसून आलेत. मात्र हे पायांचे ठसे नेमके कोणाचे आहेत, याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

आफ्रिकेचं नामिब वाळवंट

हे वाळवंट दक्षिण-पश्चिम आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्यालगत असून याचं नाव नामिब वाळवंट आहे. हे वाळवंट पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. 81 हजार चौरस किलोमीटरवर या ठिकाणी वाळूचे ढिगारे आहेत.

Mysterious footprints
समुद्राच्या तळाशी सापडलं एक रहस्यमयी छिद्र; यामधून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थाने वैज्ञानिकही हैराण

प्रचंड जुनं आहे हे वाळवंट

असं मानलं जातं की, 55 दशलक्ष वर्षे जुनं या वाळवंटाचा इतिहास आहे. शिवाय हे जगातील सर्वात जुनं वाळवंट आहे. तर दुसरीकडे सहारा वाळवंट 20 ते 70 लाख वर्ष जुनं आहे. या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. तर रात्रीच्या वेळी इतक्या पाणी गोठवण्याइतकी थंडी असते.

या वाळवंटामध्ये दिसणारे गोलाकार दिसणाऱ्या पावलांचे ठसे हे देवाच्या पावलांचे ठसे असल्याचं मानलं जातं. त्या ठिकाणी राहणाऱ्या हिंबा समुदायातील लोकांचा असा विश्वास आहे की, हे आत्म्याने तयार केलेत आणि ते त्यांच्या देव मुकुरुच्या पाऊलखुणा आहेत.

दरम्यान तज्ज्ञांनी देखील या पावलांचा अभ्यास केला. मात्र या पावलांच्या ठशांचं गूढ आजपर्यंत कोणीही उकलू शकलेलं नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, हे ठसे यूएफओच्या लँडिंगमुळे बनलेत.

पावसाचं प्रमाण फार कमी

या वाळवंटातील सर्वात कोरड्या भागात वर्षाला सरासरी केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडतो. शिवाय काही वर्ष अशीही आहेत, ज्यावेळी या ठिकाणी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी कोणताही जीव नसल्याचं दिसून येतं.

Mysterious footprints
Mysterious Story: 'या' भागात एलियन्सचा कहर! लोकांना किडनॅप करत असल्याचा स्थानिकांचा दावा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com