Mysterious Story: 'या' भागात एलियन्सचा कहर! लोकांना किडनॅप करत असल्याचा स्थानिकांचा दावा
एलिएन्स खरंच आहेत का? या प्रश्नाचं उत्तम अजूनही सापडलेलं नाही. एलिएन्सच्या बाबतीत अनेक दावे केले जातात. यामध्ये काही व्यक्तींना दावा केला आहे की, त्यांनी एलिएन आणि युएफओ पाहिले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी, अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने एलियन आणि यूएफओबद्दल एक अहवाल देखील सादर केला होता. तिथल्या एका शहरातील व्यक्तींच्या दाव्यानुसार, याठिकाणी सतत एलिएन्स येत राहतात.
या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, या ठिकाणी फिरत असलेल्या लोकांना एलिएंस किडनॅप देखील करतात. याबाबत स्थानिकांनी चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी ब्रिटनमधील एका शहरात ६००० लोकांनी युएफओ पाहिल्याचा दावा केला जातो.
रहस्यमयी यान पाहिल्याचा लोकांचा दावा
डेली स्टारच्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून स्कॉटलंडमधील स्टर्लिंगजवळील बोनीब्रिजमध्ये आकाशात 300 हून अधिक रहस्यमय यान पाहिल्या गेल्याचा दावा आहे. स्कॉटलंडच्या या शहरात गेल्या 20 वर्षांपासून आकाशात क्रॉप सर्कल आणि विचित्र गोष्टी दिसत असल्याचं म्हटलं गेलंय.
सरकारकडे तपासाची मागणी
स्थानिक नगरसेवक बिली बुकानन यांनी याप्रकरणी सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, "मला अजूनही माहित नाहीये की, ते काय असू शकतं. ते सैन्य आहे का? याचीही आम्हा कोणाला कल्पना नाही. परंतु आम्ही जाणून घेण्याची मागणी करतो.
बुकानन पुढे म्ह असेही म्हणाले की, जगभरातील यूएफओ तज्ज्ञ या गोष्टीच्या तपासणीसाठी शहरात आले होते. परंतु 1992 मध्ये आकाशातत्रिकोणी आकाराच्या वस्तू दिसल्यासंर्भात ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही.
लोकांना किडनॅप करण्याचा दावा
काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काम टाळण्यासाठी लोक दावा करतात की त्यांनी एलिएंस पाहिलेत. लोक अनेक दिवस आणि एक वर्षाहून अधिक काळ बेपत्ता राहिले. यावेळी एलियन्सने त्यांचं अपहरण केलं, असा त्यांचा दावा होता. त्यांच्यावर प्रयोग करण्यात आल्याचा दावाही अनेकांनी केला.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.