Surabhi Jayashree Jagdish
मुंबईतील मलबार हिलवरील टॉवर ऑफ साइलेंस हे पारशी समुदायाचे एक अत्यंत महत्त्वाचं स्थळ आहे. या ठिकाणी पारशी लोक त्यांच्या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करतात.
ही प्रथा जगातील इतर कोणत्याही धर्मापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि यामुळेच ही जागा अनेकांसाठी गूढ आणि रहस्यमय बनली आहे.
पारशी लोकांच्या मते, मृत शरीर हे अपवित्र असते आणि त्याला थेट या पवित्र घटकांच्या संपर्कात आणल्यास ते दूषित होतात. म्हणूनच, ते मृतदेहाला जाळत नाहीत किंवा दफन करत नाहीत.
या जागेबद्दल अनेक दंतकथा, अफवा आणि गूढ गोष्टी पसरल्या आहेत. ज्या बहुतेक लोकांनी सांगितलेल्या अनुभवांवर आधारित आहेत.
काही लोकांच्या मते, रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात त्यांना तिथून विचित्र आणि गूढ आवाज येतात. हे आवाज मृत व्यक्तींच्या आत्म्यांचे असावेत, असा काही लोकांचा समज आहे.
टावर ऑफ साइलेंसच्या परिसरात सतत गिधाडे आणि इतर पक्षी फिरताना दिसतात. त्यांच्या मोठ्या झुंडी पाहणे आणि त्यांचे आवाज ऐकणे अनेकांना भीतीदायक वाटते.
या जागेबद्दल अनेक कथांमध्ये नकारात्मक ऊर्जा आणि भयानक वातावरण असल्याचा उल्लेख आहे. येथील शांतता आणि विल्हेवाटीची पद्धत यामुळे अनेकांना हे ठिकाण भयावह वाटते.