Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात तुम्हालाही फिरायला जायचंय, पण एकाच दिवसाची सुट्टी आहे? तर आज आम्ही तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जागा सांगणार आहोत.
पावसाळ्यात कांदिवली परिसरात फिरायला जाण्यासाठी काही सुंदर आणि सोपी ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
हे कांदिवली पासून जवळ आहे. पावसाळ्यात हिरवागार जंगल, धुकट वाटा आणि पक्ष्यांची किलबिलाट असते.
कांदिवली जवळ असलेल्या आरे कॉलनीमध्येही तुम्ही फिरू शकता. याठिकाणी हिरवळ, शांत वातावरण आणि रस्त्यावरून चालताना झाडांची थेट साथ मिळते.
कांदिवलीपासून जवळ असलेल्या गोराईमध्ये हा पॅगोडा आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ शांतता आणि एकांत या ठिकाणी असून पावसाळ्यात निसर्ग अधिक सुंदर दिसतो.
कांदिवलीच्या पश्चिमेला खाडीचा किनारा आहे, जिथे मोठे मॅनग्रोव्ह जंगल आहे. पावसाळ्यात खाडीला पाणी जास्त असते आणि मॅनग्रोव्हची हिरवळ अधिक गडद होते.
पावसात बाहेर जाता आलं नाही तर तुम्ही या मॉलला भेट देऊ शकता. हा शॉपिंग, खाणं आणि इनडोअर एंटरटेनमेंटसाठी बेस्ट ऑप्शन आहे.