Pahalgam terror Attack  Saam tv
देश विदेश

India Pakistan tension : पाकिस्तानचा बुरखा फाटला; कराचीजवळील अण्वस्त्र केंद्राची पोलखोल, पाहा स्पेशल रिपोर्ट

Pahalgam terror Attack : भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेले पाकिस्तानमधील नेते वारंवार अणुबॉम्बची धमकी देत आहेत. मात्र कंगाल असलेला हा देश पोकळ धमकी देतायेत. याच पार्श्वभूमिवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्ट समोर आलाय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

Girish Nikam

ऐकलंत...पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरीयम नवाझ यांची दर्पोक्ती... महागाईने त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झाला आहे तर दुसऱ्याच्या दयेवर जगणारा या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करुन पोकळ धमकी देतायेत. मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवला आहे हे ही जगासमोर जाहीर झालं आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्याएका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपित उघड झाली आहेत.

पाकिस्तान अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचे उत्पादन करत आहे. दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्रे बनवू शकेल या दिशेने हा देश काम करतोय. अहवालानुसार, 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता. आता ही संख्या 172 झाली आहे. भारताकडे 180 अण्वस्त्रे आहेत.

पाकिस्तान अण्वस्त्रे पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमाने कराचीजवळच्या मसरूर तळावर तैनात आहेत. याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय. पाकिस्तानकडे सहा अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

अब्दाली, गझनवी, शाहीन I/A, नस्र, घौरी आणि शाहीन-II अशी त्यांची नावे आहेत. शाहीन-III आणि अब्दालीवर काम सुरू आहे. या अहवालात पाच क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगितले आहे. त्यामध्ये अ‍ॅक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे.

वीज बिल, पेट्रोल-डिझेल, डाळ-तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातील जनता त्रस्त आहे. दरवर्षी पाकिस्तान चीन, आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकवर आहे. त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. देश भिकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्बनिर्मीतीचं काम थांबवत नाही. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्याने उत्तर देण्याची वेळ आलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT