labour Rights : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे कामगारांना कोणते फायदे मिळाले? वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

मजूर मंत्री

ब्रिटिश काळात म्हणजे १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'लेबर मेंबर' म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. त्यांनी हे पद कामगारांच्या हक्कासाठी वापरलं.

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media

८ तास ड्युटी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास स्वत:साठी या विचारांची मांडणी केली.

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media

कामगारांच्या आरोग्याचा विचार

दिवसभरात बिनदिक्कत कामाच्या तासांमुळे कामगारांचं आरोग्य धोक्यात येतं. त्यामुळे बाबासाहेबांनी त्यावर बोट ठेवलं.

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media

बाबासाहेबांमुळे कामगारांसाठी कायदा झाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे Factories Act 1948 अंतर्गत ८-९ तासांच्या मर्यादेचा कायद्यात सामवेश झाला.

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media

म्हणून ९ तासांपेक्षा अधिक काम करवून घेता येत नाही

कारखाना अधिनियम १९४८ अंतर्गत कलम ५४ नुसार, कामगाराकडून ९ तासांपेक्षा अधिक काम करवून घेता येणार नाही. कामाच्या ९ तासांत ३० मिनिटांची विश्रांती अनिवार्य आहे.

basaheb ambedkar | saam tv

आठवड्यात ठराविक तासच काम

कारखाना अधिनियम १९४८ अंतर्गत कलम ५१ नुसार, कामगाराकडून एका आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम करवून घेता येत नाही.

babasaheb with his wife | Saam tv

अधिक कामाचा मोबदला

दिवसभरातील ठराविक कामापेक्षा अधिक काम केल्यास त्याचा मोबदल्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Saam Tv

बाबासाहेबांमुळे कामगारांना विविध योजना लागू

बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना झाली. तसेच कामगार विमा योजना, कामगार कल्याण योजना,भविष्य निर्वाह निधी कायदा, किमान वेतन कायदा या सारखे लाभ मिळाले.

Dr. Babasaheb Ambedkar | Saam Tv

कामगारांना मिळाल्या हक्काच्या सुविधा

महिला कामगारांना बाळंतपणाची रजा, कामगारांना भरपगारी रजा महागाई भत्ता, लेबर कॅम्प योजना, कुशल कामगारांना प्रशिक्षण या सारख्या अनेक सुविधा कामगारांना मिळाल्या.

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media

Next : बाबासाहेबांना जेवणात कोणते खाद्यपदार्थ आवडायचे?

Dr. Babasaheb Ambedkar | Social Media
येथे क्लिक करा