Pakistan Clash Saam Tv
देश विदेश

Pakistan Clash: पाकिस्तानात जमिनीचा वाद पेटला, दोन गटात तुफान राडा; आतापर्यंत ४३ ठार

Pakistan News: पाकिस्तानमध्ये दोन गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

Priya More

पाकिस्तानच्या कुर्रम या आदिवसी जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. या जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कुर्रम जिल्ह्यातील हिंसाचार प्रभावित भागात पोलिस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या वायव्यला असलेल्या कुर्रम या आदिवासी जिल्ह्यात जमिनीच्या वादामुळे हिंसाचार भडकला आहे. जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी दोन गट आमने-सामने आले आहेत. २४ जुलैपासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही सुरू आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक आदिवासी जिरगाच्या मदतीने आणि समर्थनाने दोन गटाने सोमवारी तात्पुरता युद्धविराम जाहीर केला. अस्थिर पर्वतीय कुर्रम प्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून दोन गटांमध्ये जातीय संघर्ष आणि दहशतवादी हल्ले झाले आहेत. सरकारच्या गृह आणि आदिवासी व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, कुर्रममध्ये सध्या आठ मोठे संघर्ष सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात एका मालमत्तेच्या मालकीवरून दोन गटांमध्ये रक्तरंजित राडा झाला. या घटनेची माहिती जिल्हाभर पसरली. त्यामुळे हिंसाचार उसळला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या. यावेळी गोळीबाराच्या घटना देखील घडल्या. हा हिंसाचार र्ष आणि अशांतता टाळण्यासाठी परिसरातील बहुतांश गावांमध्ये रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांना अन्न आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT