Pakistan Hospital Fire News AI Iamge
देश विदेश

Hospital Fire : रुग्णलयात अग्नितांडव! १५ नवजात बाळांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Pakisatn Islamabad PIMS Hospital Fire News : पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील PIMS रुग्णालयाच्या नवजात कक्षात भीषण आग लागून १५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Alisha Khedekar

  • इस्लामाबादमध्ये रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या कक्षात भीषण आग

  • कक्षात असलेल्या १६ बाळांपैकी १५ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

  • एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज

  • सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण

महाराष्ट्रातील अमरावतीत काही दिवसांपूर्वी स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ३ नवजात बाळांचा मृत्यू झाला. अशातच आता पाकिस्तनमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १५ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) रुग्णालयात घडली.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात एकूण १६ बाळे होती. आग आणि धुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत केवळ एका नवजात बालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले, तर १५ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, नवजात बालकांच्या कक्षातील एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने परिसराला वेढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये मोठी धावपळ उडाली. सकाळी साधारण ७ वाजण्याच्या सुमारास स्त्रीरोग विभागात आग लागली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि अग्निशमन दलाचे जवान रुग्णालयात दाखल झाले.

आग नियंत्रणात आणण्यासोबतच विभागातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम करण्यात आले. आग विझवल्यानंतर परिसरात कुलिंग ऑपरेशनही करण्यात आले. या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील नवजात बालकांच्या आणि प्रसूती विभागातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालयातील एअर कंडिशनिंग यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांची योग्य देखभाल होत होती का, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे. या भीषण दुर्घटनेमुळे मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!₹1500 की ₹3000, कोणत्या महिन्याचा हप्ता झाला जमा? आताच बॅलेन्स करा चेक

H1N1 symptoms: डोळ्यांमध्ये अचानक हे 2 बदल दिसून येतात? सावध व्हा, स्वाइन फ्लूची लक्षणं असू शकतात

हृदय, मेंदू आणि स्किनसाठी दालचिनीचे ‘हे’ अनोखे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Mumbai : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; केस ओढले, चापटा मारल्या अन्... ; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT