Pakistan Saam Tv
देश विदेश

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

Pakistan’s Peace Meeting: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. हे युद्ध थांबले नाही तर हातात पुन्हा कटोरा घेण्याची वेळ येईल याची भीती पाकिस्तानला आहे.

Priya More

Summary -

  • पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी बैठक आयोजित केली

  • बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्र्यांची नाचक्की

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची खिल्ली

  • मध्य पूर्व युद्धाचा पाकिस्तानवर परिणाम

रोहित कदम, साम टीव्ही

आखाती युद्ध थांबलं नाही तर हाती पुन्हा कटोरा घेण्याची वेळ येईल, अशा भीतीनं पाकिस्ताननं एक बैठक आयोजित केली होती. पण या बैठकीत पाकिस्तान पुरता तोंडावरच आपटलाय तो कसा, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण आम्ही जसं म्हणतोय अगदी तसंच घडलंय. होय. ३ देशांच्या भांडणात वासरात लंगडी गाई शहाणी या म्हणी प्रमाणे शहाणपणा करण्याच्या नादात पाकचं पुन्हा जगभरात हसू झालंय. हसू.. होय आम्ही आता तुम्हाला जे दाखवणार आहोत. ते पाहिलं तर तुम्हाला देखिल हसून हसून पोटात दुखेल. पाहा...

धडाम् धुडम्, आणि म्हणे हे युद्ध थांबवणार? ज्यांना स्वताचा भार सांभाळता येत नाही ते युद्ध थांबण्यासाठी पुढाकार घेतायेत... आहे ना कमाल? जागतिक पातळीवर धडपडण्याचं निमित्त होतं ते, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात आयोजित केलेल्या युद्ध थांबवण्याच्या बैठकीचं. यावेळी सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत बैठक पाकिस्ताननं आयोजित केली होती आणि त्याच बैठकीत इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांचं स्वागत करतांना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची ही नाचक्की झाली.. घडलेला प्रकार जगभरात लाईव्ह दिसल्यामुळे पाकिस्तानच्या धडपडीनं अनेकांना हसू अनावर झालं.

जगभरात शांतता नांदवण्याच्या नकली प्रयत्नात परराष्ट्रमंत्र्यांचा खांदा मात्र तुटला.. मध्य पूर्वेतील युद्धात पाकची अवस्था दयनीय झाली. युद्ध थांबल नाही तर हातात पुन्हा कटोरा येण्याच्या भीतीमुळे या अशा बैठकांचे आयोजन पाकनं केलं खरं पण त्याच बैठकीत पाकिस्तान पुरता तोंडावरच आपटला. आता फ्रॅक्चर खांदा घेऊन परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्यावर बंद दाराआड उपचार घेण्याची वेळ आली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये, इतकंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

Vijay Thalapathy: मुख्यमंत्र्यांनी विश्वास जिंकला, थलपती विजय यांना १४४ आमदारांनी केलं मतदान, कोणता पक्ष फुटला?

Kalyan : 'लुडो'चा वाद टोकाला गेला, रागाच्या भरात मामाने भाच्याचा काटा काढला; कल्याणमधील खळबळजनक घटना

Crime News: भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

Gold Limit Rules in India: तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? वाचा नियम काय सांगतात

SCROLL FOR NEXT