Pakistan Blast Saam Tv
देश विदेश

Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सैनिकांच्या मुख्यालयाजवळ २ बॉम्बस्फोट अन् गोळीबार; पाहा VIDEO

Pakistan Bombblast Video: पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. सैनिकांच्या मुख्यालयाजवळ दोन स्फोट करण्यात आले. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे पाकिस्तान हादरले आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

Priya More

Summary -

  • पाकिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले

  • पाकिस्तानच्या पेशावरमधील एफसी मुख्यालयाजवळ दोन स्फोट आणि गोळीबार

  • एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्यानंतर चकमक सुरू

  • सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले

पाकिस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी सकाळी दोन स्फोट आणि गोळीबाराची घटना घडली. पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. याठिकाणी २ स्फोट आणि गोळीबार करण्यात आला आहे. पेशावरचे कॅपिटल सिटी पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद यांनी हल्ल्याची माहिती दिली.

या दहशतवादी हल्ल्यानंतर पेशावरमधील सैन्यांच्या मुख्यालयाजवळ सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये चकमक सुरू आहे. अधूनमधून गोळीबार सुरू आहे. याठिकाणी दोन स्फोट घडवून आणण्यात आले. दहशतवाद्यांनी मुख्यालयाला लक्ष्य करून गोळीबार केला. सुरक्षा दलांने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेश सुरू करण्यात आले आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर पेशावरमधील घटनास्थळाला पूर्णपणे वेढा घालण्यात आला आहे. सार्वजनिक आणि वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आणि रॅपिड रिअ‍ॅक्शन फोर्सचे पथक परिसरात सर्च ऑपरेशन करत आहेत. अशी देखील माहिती समोर आली आहे की, एका आत्मघातकी हल्लेखोराने एफसी मुख्यालयाच्या गेटवर स्वतःला उडवून दिले. स्फोटानंतर गोळीबार देखील करण्यात आला. या स्फोट आणि गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात किती जणांचा मृत्यू आणि किती जण जखमी झाले आहेत याची माहिती समोर आली नाही. या स्फोटाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दहशतवादाचे केंद्र आहेत. या दोन्ही प्रांत वारंवार दहशतवादी हल्ले होत असतात. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. सध्या या हल्ल्याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीच्या आत्महत्येनंतर आई वडील खचले, कुटुंबानं आयुष्याचा दोर कापला, सुसाईट नोटमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

Tv Screen Cleaning Tips: टिव्ही स्क्रिन स्वच्छ कशी कराल?

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट

Devendra Fadnavis : मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार, मुख्यमंत्र्यांनी केली नव्या उड्डाणपुलाची घोषणा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT