Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

Pakistan-Afghanistan News : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक कऱण्यात आला आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे आठ युवा खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर चार अन्य अफगाण नागरिक जखमी झाले आहेत.
Pakistan airstrike kills Afghan players in Paktika
After Pakistan’s airstrike on Afghanistan’s Paktika region, eight young Afghan players were killed — the Afghan Cricket Board mourns their loss.Google
Published On

Pakistan Airstrikes Afghanistan Latest News Update : पाकिस्तान आणि अफगानिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती तयार झाली आहे. सिझफायर असतानाही पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राइक करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या आठ खेळाडूंचा मृत्यू (8 Afghan cricketers die in Pakistani airstrike) झाला आहे. त्याशिवाय अनेकजण जखमी आहे. अफगाणिस्तान बोर्ड अन् दिग्गज खेळाडूंनी याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेले सर्व खेळाडू सामना संपल्यानंतर घराकडे निघाले होते. त्याचवेळी पाकिस्तानकडून बॉम्ब टाकण्यात आले. (Pakistan airstrike kills Afghan players in Paktika) युद्धबंदी असूनही पाकिस्तानकडून हल्ला झाल्याने दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहचला आहे.

अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात (pakistan air strike on afghanistan) मृत्यू झालेले ८ खेळाडू क्लब लेव्हलचे क्रिकेटर होते. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगानिस्तानमधील पक्तिका परिसरात पाकिस्तानच्या हवाई दलाने बॉम्ब फेकले. या हल्ल्यात स्थानिक एका क्लबलचे आठ खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. अन्य काही खेळाडू जखमी झाले आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. पण वाटेतच पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांचा जीव गेला. Tensions rise after Pakistan air attack on Afghanistan

Pakistan airstrike kills Afghan players in Paktika
Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

अफगाण बोर्डाने काय म्हटले ? Afghanistan cricket board reacts to Pakistan bombing

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेल्या अफगान खेळाडूंच्या मृत्यूवर अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने दु:ख व्यक्त केले आहे. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने एक्स खात्यावर खेळाडूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज संध्याकाळी पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या भ्याड हल्ल्यात पक्तिका प्रांतातील उर्गुन जिल्ह्यातील क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र दुःख व्यक्त करत आहे.

Pakistan airstrike kills Afghan players in Paktika
ST Buses : टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटीकडेही लक्ष द्या, लाल परीची दयनीय अवस्था

पाकिस्तानच्या या हल्ल्याविरोधात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताप्रमाणेच निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, या दुःखद घटनेनंतर आणि पीडितांना आदर म्हणून, नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या पाकिस्तानसोबतच्या आगामी त्रिकोणीय टी-२० मालिकेत सहभागी होण्यार नाही.

Pakistan airstrike kills Afghan players in Paktika
Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

सीजफायरनंतरही हवाई हल्ला Ceasefire violation between Pakistan and Afghanistan

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ४८ तासांच्या युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने याबाबतची घोषणा केली होती. अफगाणिस्तानकडूनही युद्धबंदीवर सहमती दर्शविली. सिजफायर असतानाही पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाचे ढग गडद होत असल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक सांगत आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून काय प्रत्युत्तर मिळतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

Pakistan airstrike kills Afghan players in Paktika
Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com